Download App

संजय राऊत यांचा ताफा अडवला! पोलिसांवर हक्कभंग आणणार, राऊत यांचा इशारा

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Rahul Kul :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्या भीमा पाटस सारखान्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यांनतर आज संध्याकाळी संजय राऊत यांची वरवंड येथे सभा होणार आहे, पण यावेळी कारखान्याच्या परिसरात जाणाऱ्या संजय राऊत यांचा ताफा अडवण्यात आला आहे.

प्रकरण काय ?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपआमदार राहुल कुल यांच्या भीमा पाटस सारखान्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे केली आहे. शेकडो कोटींचा भ्रष्टाचार राहुल कुल यांनी त्या कारखान्यामध्ये केला आहेत. हे सरळ सरळ मनीलॉंड्रिंग आहे. अनेक खोटे लोन दाखवुन पैसे घेण्याचे प्रकार झाले आहेत. त्या पैशाचा हिशोब न देणं असे प्रकाल झालेले आहेत. असा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणाच्या विरोधात संजय राऊत आज दौडमधील वरवंड येथे जाहीर सभा होणार आहे. त्याच्या आधी ते कारखान्याच्या परिसरात जाण्यासाठी निघाले असताना त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला होता.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नीरा उजव्या कालव्याची सुटणार सलग दोन आवर्तनं

कारखान्याच्या संस्थापकांना अभिवादन

यावेळी कारखान्याच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे संजय राऊत यांना रोखण्यात आले आहे. यावेळी संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे आहे की त्या परिसरात असलेल्या कारखान्याच्या संस्थापक असलेल्या मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी जाणार आहोत, बाकी आम्ही काहीही करणार नाही. असं यावेळी त्यांनी सांगितलं.

यावेळी संजय राऊत हे पोलिसांवर देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांनी पोलिसांवर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा दिला आहे.

Tags

follow us