Download App

माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सासवडकरांनी केली गर्दी…

  • Written By: Last Updated:

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल पुण्याहून दिवेघाट पार करत सासवड येथे मुक्कामी होती. आज देखील पालखीचा मुक्काम हा सासवड येथेच असून पालखी स्थळावर हजारोच्या संख्येने सासवड मधील नागरिकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये येणार असल्याने सासवडला मोठी यात्रा भरली असून सासवड पंचक्रोशीतील अनेक नागरिक सासवडला आले आहेत.(Sant Dnyaneshwar Maharaj’s palanquin in Saswad)

दरम्यान, संत सोपान काका यांच्या पालखीचे प्रस्थान आज सासवड येथून पंढरपूरकडे झालं. उद्या सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा देखील सासवड येथून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे. उद्या माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजुरीचे खंडेराया यांच्या नगरीत असणार आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने तयारी केली असून माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी जेजुरी संस्थान आणि जेजुरीकर सज्ज झाले आहेत.

Refined Oil : महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना दिलासा : मोदी सरकारचा मोठा निर्णय

18 जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. 19 जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि 20 जूनला तरडगाव, 21 जूनला फलटणकडे प्रस्थान करेल. 22 जूनला पालखीचा फलटणमध्ये मुक्काम असेल. 23 जूनला नातेपुते, 24 जूनला माळशिरस मुक्काम, 25 जूनला वेळापूर, 26 जूनला भंडी शेगाव, 27 जूनला वाखरी, 28 जूनला पंढरपूर, 29 जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल. पालखी सोहळ्यात फलटण येथे 21 जून, बरड येथे 22 जूनला एक दिवसांच्या मुक्कामासाठी सोहळा विसावणार आहे. 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि मुक्काम होईल. 22 जूनला बरड मुक्काम असेल.

Tags

follow us