Download App

‘ससून’ ड्रग्ज रॅकेटप्रकरण: अखेर सरकारला आली जाग, चौकशीसाठी समिती नेमली

  • Written By: Last Updated:

Sasoon Hospital Drug Racket : पुण्यातून ससून हॉस्पिटलमधून (Sasoon Hospital) ड्रग्ज पुरवठ्याचे रॅकेट सुरू होते. या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला ललित पाटील (Lalit Patil) हा हे रॅकेट चालवत होता. ललित पाटील हा हॉस्पिटलमधून पळून गेला आहे. त्यामुळे ससून प्रशासनाबबात संशय निर्माण झाला आहे. यानंतर पोलिसांनी नाशिकमध्ये हे मोठी कारवाई करत तिनशे कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्यामुळे ससून हॉस्पिटल,पोलिस प्रशासन रडारवर आले आहे. आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. त्यासाठी चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे.


कंत्राटी पोलीस नेमण्यासाठी सरकार वर्षाला 100 कोटी रुपये का देतंय? कंत्राटी भरतीचा निर्णय का?

या समितीचे मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे अध्यक्ष आहेत. तर सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. हेमंत गोडबोले, मुंबई ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एकनाथ पवार हे तिघे सदस्य म्हणून काम पाहणार आहे. या समितीने सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल 15 दिवसांत सरकारला द्यायचा आहे.

Chandrashekhar Bawankule : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? बावनकुळेंनी खरंच सांगून टाकलं…

ड्रग्ज पुरवठ्याचे रॅकेट हे आरोपी रुग्णालयातून चालवत होता. ललित पाटील हा गंभीर आजारी आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयातील डॉक्टर हे उपचार करत होते. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मंत्री भुसे यांनी ससून रुग्णालय प्रशासनाला फोन केला होता. त्यामुळे भुसे यांचे कॉल रेकॉर्ड तपासा, त्यानंतर खरी माहिती समोर येईल, अशी मागणी सुषमा अंधारे यांची होती. भुसे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत.


न्यायालयाने पुणे पोलिसांना खडसावले

ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा पळून गेलेला आहे. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. त्याचा भाऊ भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. या दोघांना बुधवारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या वेळी न्यायालयाने पुणे पोलिसांना खडसावले आहे. ललित पाटील हा मुख्य आरोपी तुमच्या ताब्यात होता. तुम्हाला नीट सांभाळला आले नाही का ? असे न्यायालयाने म्हटले आहे.

Tags

follow us