Chandrashekhar Bawankule : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? बावनकुळेंनी खरंच सांगून टाकलं…
Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राचे आगामी काळातील मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप (BJP)आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून (NCP Ajitdada group)आगामी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच (Eknath shinde)असतील असं स्पष्ट केलं. असं असलं तरी आता पुन्हा एकदा 2024 मधील मुख्यमंत्री कोण होणार? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत, त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी आगामी मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दल स्पष्टच सांगितलं आहे. त्यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील माध्यमांशी संवाद साधला.
TYFC Collection : प्रेक्षकांना भावला नाही ‘थॅंक यू फॉर कमिंग’; जाणून घ्या कमाई
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतं की, अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, त्याच्यात काही गैर नाही. आपापल्या पक्षाचा नेता मोठा व्हावा, असं सर्वांनाच वाटत असतं. कारण आपण त्यासाठीच पक्षात काम करत असतो. पण जेव्हा महायुती होते, 11 राजकीय पक्ष एकत्र येतात, जेव्हा पार्लमेंटरी बोर्ड एकत्र बसेल.
पवारांचे थेट वार! अजितदादांचे मुख्यमंत्रीपद स्वप्नचं राहणार; UN चा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिलं तरी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे केंद्रीय नेतृत्व एकत्र बसेल आणि ज्याला मुख्यमंत्री करेल ते आम्हाला सर्वांना मान्य असेल असेही यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
आत्ता 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, पक्षाने त्यांना स्विकारलं आहे, म्हणून आम्ही पुढं जात आहोत. उद्या जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल. त्याचवेळी पत्रकारांनी बावनकुळे यांना विचारले की, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजितदादा मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार मी घालेन, त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुप्रिया सुळे हे मनातून बोलल्या की, अंतर्मनातून बोलल्या की, भाऊ-बहिणीचं प्रेम म्हणून बोलल्या.
खरंतर आता सुप्रिया सुळे यांना एका-एका मिनिटाला अजितदादा चालत नाही, एका-एका सेकंदाला घरातही चालत नाही अन् बाहेरही चालत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, अजितदादांना अंडरइस्टीमेट करण्यासाठी सुप्रिया सुळे असं म्हणाल्या असतील, असंही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार कोण असणार? असा प्रश्न विचारताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी एवढंच सांगेल की, महायुतीचा उमेदवार 51 टक्के मतं घेऊन विजयी होईल. बारामतीमध्ये उमेदवार कोण असेल याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल पण मी एवढंच सांगेल की, महायुतीचा उमेदवार 51 टक्के मतं घेईल.