Download App

सतीश वाघ प्रकरण, पुणे पोलिसांची मोठी कारवाई, अपहरणकर्ते ताब्यात

Satish Wagh Case : भाजपचे विद्यमान विधान परिषद आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या अपहरण झालेले मामा सतीश वाघ (Satish Wagh) हत्या

  • Written By: Last Updated:

Satish Wagh Case : भाजपचे विद्यमान विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या अपहरण झालेले मामा सतीश वाघ (Satish Wagh) हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे.

माहितीनुसार, वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी शर्माला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे 09 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तीन ते चार जणांनी फुरसुंगी फाटा येथून चारचाकी वाहनातून अपहरण केले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणाचा तपास सुरु असताना सतीश वाघ यांचा मृतदेह यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. मात्र ही हत्या का करण्यात आली याबाबत कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाही.  तसेच पोलीस या प्रकरणात इतर आरोपींचा देखील शोध घेत आहे.

माहितीनुसार, योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ हे रिअल इस्टेट बिझनेसमध्ये होते. त्यांचं स्वत:चं मोठं नाव असून ते योगेश टिळेकर यांचे मामा असल्याने अनेक लोकं त्यांना ओळखतात. सतीश वाघ काल 9 डिसेंबर रोजी सकाळी सोलापूर रस्त्यावरील ब्लू बेरी हॉटेल समोर थांबले असताना अचानक एक चार चाकी समोर येऊन थांबली. त्यातील दोघाजणांनी त्यांना जबरदस्तीने त्या गाडीत बसवलं. वाघ ‘वाचवा वाचवा’ असं ओरडले, त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाने मागे फिरून पाहिलं. त्या व्यक्तीने कारचा पाठलागही केला. मात्र, कार वेगाने सोलापूर रस्त्याच्या दिशेने गेली. त्यानंतर या व्यक्तीने पाहिलेला प्रकार त्यांच्या घरी जाऊन सांगितला.

ही घटना सोमवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास फुरसुंगी फाटा येथील ब्ल्यू-बेरी हॉटेल समोर घडली. यानंतर सतिश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार दिली. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेलं होतं.

या घटनेसंदर्भात अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील (Manoj Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांकडून दिवसभर त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र, काही वेळानंतर पुण्यातील यवत, दौंडजवळ झुडपात त्यांचा मृतदेह सापडला. अपहरणकर्त्यांकडून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज हा वर्तवला जात आहे. त्यानंतर सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल करत पुणे गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला. मात्र त्यानंतर काही तासांतच यवत गावच्या हद्दीत भाजप आमदार सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता.

पुन्हा शेतकरी आंदोलन, 14 डिसेंबरला दिल्लीला जाणार, शेतकरी संघटनेची घोषणा

अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या करून यवत येथील महामार्गाजवळील झुडपात त्यांचा मृतदेह फेकून दिला. आता त्यांच्या मृत्यूशी संबंधित तपशील आणि अपहरणामागील नेमका हेतू उघड करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत त्यांच्या शरीरावर चाकूने वार केलेल्या खूणा असल्याचं समजतंय.

follow us