Download App

सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं; जुन्या वादातूनच दिली 5 लाखांची सुपारी, अन्…

  • Written By: Last Updated:

Satish Wagh Murder Case Update : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची (Satish Wagh Murder) 9 डिसेंबर रोजी हत्या झाली होती. अखेर या हत्या प्रकरणाची उकल झालीय. सतीश वाघ यांचं अपहरण करून मृतदेह झुडपात फेकून दिला होता. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने वेगात तपास सुरू केला होता. सतीश वाघ यांच्या शेजारीच राहत असलेल्या व्यक्तीने हे सगळं कृत्य केल्याचा खुलासा (Crime News) पोलीस तपासात झालाय. हा खून खाजगी आणि वैयक्तिक कारणातूनच केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिलीय.

फडणवीसांचा शिंदेंना मोठा झटका, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे नवे प्रमुख रामेश्वर नाईक, मंगेश चिवटेंना हटवलं…

सतीश वाघ काल 9 डिसेंबर रोजी सकाळी सोलापूर रस्त्यावरील ब्लू बेरी हॉटेल समोर थांबले असताना अचानक एक चार चाकी समोर येऊन थांबली. त्यातील दोघाजणांनी त्यांना जबरदस्तीने त्या गाडीत बसवलं. ही घटना सोमवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास फुरसुंगी फाटा येथील ब्ल्यू-बेरी हॉटेल समोर घडली. यानंतर सतिश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार दिली. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेलं होतं.

ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवरून नाना पटोलेंचा थेट वार; म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळेंना..

सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल करत पुणे गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला. मात्र त्यानंतर काही तासांतच यवत गावच्या हद्दीत भाजप आमदार सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या करून यवत येथील महामार्गाजवळील झुडपात त्यांचा मृतदेह फेकून दिला.

सतीश वाघ यांची हत्या वैयक्तिक कारणातून झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलंय. याप्रकरणी पाच पैकी चार जणांना पोलिसांनी अटक देखील केलीय. या प्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एबीपी माझाला याबाबतची माहिती दिली आहे.

 

follow us