Satish Wagh Murder Update : पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीष वाघ (Satish Wagh) यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. ही घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी आता एक मोठं अपडेट समोर (Pune Crime) आलंय. सतीष वाघ यांच्या हत्येसाठी त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणात झालाय.
निवडणुकीआधीच कुस्ती! काँग्रस नेत्याच्या ‘त्या’ वक्तव्यावर आप नेत्यांचा संताप; कारवाईची मागणी
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीष वाघ यांची हत्या करण्यासाठी त्यांची मामी मोहिनी वाघ हिनेच सुपारी दिली होती. या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. त्याचं नाव अक्षय जवळकर असं (Satish Wagh Murder Update) आहे. अक्षय हा सतीष वाघ यांच्या मुलाचा मित्र आहे. अक्षय आणि मोहिनीत प्रेमसंबंध निर्माण झाले होते, याची भनक मात्र सतीष वाघ यांना लागली होती. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. त्यामुळे अक्षयसोबतच्या अनैतिक संबंध जगजाहीर होवू नये म्हणून तिने नवऱ्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
पत्नीच्या देखभालीसाठी सोडली नोकरी पण..; वाचा, हृदयद्रावक प्रसंग कुठे घडला?
अक्षय जावळकरचे आई-वडील 2001 साली सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले होते. त्यावेळी अक्षय फक्त नऊ वर्षांचा होता . अक्षयचं नेहमीच मोहिनी (Mohini Wagh) आणि सतीष यांच्या घरी येणं-जाणं होतं. मोहिनीने अक्षयच्या मदतीने सतीश वाघच्या हत्येचा कट रचला होता. त्यानंतर अक्षयने त्याच्या मित्रांना देखील यात सामील करून घेतलं. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं त्यांनी अपहरण केलं. केवळ पंधरा मिनिटांमध्ये 70 वार करत वाघ यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर पैशांसाठी अपहरण केल्याचा बनाव करण्यात आला.
याप्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी मोहिनी आणि अक्षय या दोघांचीही पार्श्वभूमी तपासली. पोलीस तपासात वाघ यांच्या एका जवळच्या व्यक्तीने मोहिनी आणि अक्षयमध्ये अकरा वर्षापासून संबंध असल्याचं पोलिसांना सांगितलं. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. मोहिनीने सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रूपयांची अक्षयला सुपारी दिली होती. अक्षयला आधीच दीड लाख रूपये देखील दिले गेले होते. आत्तापर्यंत मोहिनी वाघ, पवनकुमार शर्मा, विकास शिंदे, आतिश जाधव, अक्षय जवळकर यांना अटक करण्यात आलीय.