Download App

Satyajeet Tambe : मी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता ? पण…

  • Written By: Last Updated:

नाशिक : “मला उमेदवारी मिळू नये, बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचा हा डाव होता” असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला. त्यावर आज शेवटी सत्यजित तांबे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या घडामोडींचा उल्लेख केला.

त्यावेळी सत्यजित तांबे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचीही माहिती दिली. ते म्हणाले की, “मी उद्धव ठाकरे यांना दोन तीन वेळा फोन केला पण ते फोनवर आले नाहीत.” ते पुढे म्हणाले की शिवसेनेने कुणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी माझ्या पक्षात काय होते ते मी बघीन.” त्याचवेळी त्यांनी “मी अजित पवार, संजय राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे सगळ्यांना सांगितले. महाविकास आघाडी पाठिंबा द्यावा म्हणून संपर्कात होतो.” असं माहितीही दिली.

योगायोग म्हणजे सत्यजित तांबे यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या शुभांगी पाटील यांनी आजच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीच्या मतदार संघाचे AB फॉर्म देण्यात आले असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. AB फॉर्म सारखे महत्वाचे फॉर्म प्रदेशाध्यक्षाने चुकीचे दिले चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता. असा आरोपही सत्यजीत तांब यांनी पाटोलेंवरती केला. चुकीचे फॉर्म देणाऱ्यांवर काँग्रेस काय कारवाई करणार का ?असा सवाल देखील तांबेनी केला.

मी अपक्ष नाही तर काँग्रेसच्या नावाने फॉर्म भरला पण AB फॉर्म नसल्यामुळे तो अपक्ष बनला तसेच हे मला आणि बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी करण्यात आलं, हे सगळं ठरून करण्यात आलं असा देखील आरोप त्यांनी केला. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचं काम काही नेत्यांकडून केलं जात आहे असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी पटोलेंच नाव न घेता केला.

Tags

follow us