महिलेला एकटं पाहून सेल्समननं केलं घाणेरडं कृत्य…

पुणे : काही दिवसांपासून पुण्यात (Pune)शाळकरी, महाविद्यालयीन तरुणी (Schools, college girls)किंवा महिलांची छेडछाड (teasing)वा विनयभंग(molestation), अशा गुन्ह्यांचा आलेख (Crime graph)वाढतानाच दिसत आहे. दरम्यान, बुधवारी (दि.15) सदाशिव पेठ येथे एक लाजिरवाणी घटना घडली आहे. कपड्यांची खरेदी करण्यासाठी पती आणि पत्नी सदाशिव पेठेतील ब्राऊन बॉईज मेन्स या दुकानात गेले असता, या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने संबंधित […]

धक्कादायक ! तरुणाकडून गावातील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

Crime

पुणे : काही दिवसांपासून पुण्यात (Pune)शाळकरी, महाविद्यालयीन तरुणी (Schools, college girls)किंवा महिलांची छेडछाड (teasing)वा विनयभंग(molestation), अशा गुन्ह्यांचा आलेख (Crime graph)वाढतानाच दिसत आहे.

दरम्यान, बुधवारी (दि.15) सदाशिव पेठ येथे एक लाजिरवाणी घटना घडली आहे. कपड्यांची खरेदी करण्यासाठी पती आणि पत्नी सदाशिव पेठेतील ब्राऊन बॉईज मेन्स या दुकानात गेले असता, या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने संबंधित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असं अश्लील कृत्य करून विनयभंग केला आहे. याबाबत राजू परिहार (त्रिमूर्ती चौक आर. के बिर्याणीच्या मागे धनकवडी) याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक दृष्ट्या सक्षम खासदारांची पेन्शन बंद करावी, काँग्रेस खासदारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या पतीसोबत कपडे खरेदी करण्यासाठी सदाशिव पेठ येथील कापड दुकानात गेल्या होत्या. यानंतर त्यांचे पती कपडे ट्राय करण्याकरिता चेंजिंग रूममध्ये गेले असता त्यावेळी फिर्यादी महिलेला दुकानात एकटंच पाहून आरोपीने गैरफायदा घेत महिलेसोबत अश्लील चाळे केले.

त्यानंतर फिर्यादी महिलेने खडक पोलीस ठाण्यात परिहारच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

Exit mobile version