सेवा विकास बँक फसवणूक : रोजरी एज्युकेशन ग्रुपचे विनय अऱ्हानासह एक ताब्यात; CID ची कारवाई

Seva Vikas Bank Fraud : पुण्यातील सेवा विकास बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी ( Seva Vikas Bank Fraud ) गुरुवारी (28 मार्च ) सीआयडी अधिकाऱ्यांनी रोजरी एज्युकेशन ग्रुपचे विनय अऱ्हाना आणि सागर सूर्यवंशी यांना अटक केली आहे. सीआयडीने त्यांना अंमलबजावणी सक्त वसुली संचलनालयाकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या दोघांनाही रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विशेष न्यायालयात हजर […]

Seva Vikas Bank Fraud : ब्रेकींग! सेवा विकास बॅंक फसवणूक प्रकरणी रोझरी ग्रुपचे अऱ्हाना अन् सूर्यवंशी सीआयडीच्या ताब्यात

Seva Vikas Bank Fraud :

Seva Vikas Bank Fraud : पुण्यातील सेवा विकास बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी ( Seva Vikas Bank Fraud ) गुरुवारी (28 मार्च ) सीआयडी अधिकाऱ्यांनी रोजरी एज्युकेशन ग्रुपचे विनय अऱ्हाना आणि सागर सूर्यवंशी यांना अटक केली आहे. सीआयडीने त्यांना अंमलबजावणी सक्त वसुली संचलनालयाकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या दोघांनाही रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

माद्रित स्पेन मास्टर्समध्ये PV Sindhu ची विजयाकडे वाटचाल; उपांत्य फेरीत तैपेईच्या खेळाडूचा पराभव

पुण्याच्या शिवाजी नगर न्यायालयात ही सुनावणी पार पडली. तर शिवाजी नगर न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकरे सत्र न्यायाधीशांनी रात्री 12.30 वाजता सुनावणी घेतली. यापूर्वी पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला प्रकरणात रात्री 11 वाजता पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केले होते.

ट्रान्सजेंडर समुदायासाठी फूड ट्रकच्या उद्घाटनाला पोहोचला आयुष्मान, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

काय आहे सेवा विकास बॅंक फसवणूक प्रकरण?

गेल्या वर्षी बेकायदेशीर रित्या शेकडो कोटींचं कर्ज दिल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड या भागातील द सेवा विकास सहकारी बँकेचा माजी संचालक अमर मुलचंदाणीच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. या बॅंकेने म्हणजे या बॅंकेच्या संचालकांनी तब्बल 124 बनावट कर्जांचे प्रस्ताव तयार केले होते. यातून त्यांनी 430 कोटी रूपयांचे कर्ज विविध व्यक्ती आणि संस्थांना बेकायदेशीररित्या दिले. ज्या व्यक्तींना हे कर्ज देण्यात आले त्यांना हे कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती. त्यामुळे कोणतेही निकष न तपासता देण्यात आलं होतं.

Exit mobile version