ट्रान्सजेंडर समुदायासाठी फूड ट्रकच्या उद्घाटनाला पोहोचला आयुष्मान, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

ट्रान्सजेंडर समुदायासाठी फूड ट्रकच्या उद्घाटनाला पोहोचला आयुष्मान, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आणि युनिसेफचा (UNICEF) राष्ट्रीय राजदूत म्हणून अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) त्यांच्या चित्रपट आणि वैयक्तिक कृतींद्वारे सातत्याने सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकतो. महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी तो आपल्या व्यासपीठाचा उपयोग करतो आणि मुलांसाठी आश्वासक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम करतो.

अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana ) आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. शिवाय हा अभिनेता त्याच्या चांगुलपणासाठीही ओळखला जातो. (Social media) अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अलीकडेच त्यांनी जिरकपूरमध्ये ट्रान्सजेंडर (Transgender) समुदायासाठी फूड ट्रकच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. ट्रान्सजेंडर्सच्या हितासाठी पुढे आलेला अभिनेता म्हणाला की, फूड ट्रकचे उद्घाटन हे एक छोटेसे पाऊल आहे, ज्यासाठी लोकांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अभिनेता आयुष्मान खुराना म्हणाला की, ‘या फूड ट्रकचे उद्घाटन एका खास कारणासाठी करण्यात आले आहे. ट्रान्स कम्युनिटीचा समाजात समावेश करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे. हे एक लहान पाऊल आहे. समाजाचा विचार करणाऱ्या माझ्यासारख्या विचारवंतांनी, नेत्यांनी आणि संवेदनशील माणसांनी या कार्यात मदतीसाठी आवर्जून पुढे यावे.

Amruta Khanvilkar: ‘…म्हणून मला मास्टर्स करायचं, अभिनेत्रीने सांगितलं पुढचं पाऊल

आयुष्मान पुढे म्हणाला, ‘ते (ट्रान्स) आपल्या देशातील वंचित समुदाय आहेत. हा फूड ट्रक त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकणार आहेत. जेणेकरून त्यांना समाजात स्थान मिळू शकणार आहे. अभिनेता पुढे म्हणाला की, ‘मी एक कलाकार आहे. मी चित्रपटातून संदेश देतो आणि स्वतः शिकतो. मी अजूनही LGBTQ+ समुदाय काय आहे हे शिकत आहे. मी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सर्वांनी शिकले पाहिजे. मला असे वाटते की चित्रपट नक्कीच संदेश देतात, परंतु मी रीलसह वास्तविक जीवनात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज