Ayushmann Khurrana: अभिनेत्याला मिळाला ‘स्टार ऑफ द डेकेड’ अवॉर्ड; पोस्ट शेअर करत म्हणाला…

Ayushmann Khurrana: अभिनेत्याला मिळाला ‘स्टार ऑफ द डेकेड’ अवॉर्ड; पोस्ट शेअर करत म्हणाला…

Ayushmann Khurrana: बॉलिवूडचा (Bollywood) हरहुन्नरी अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आपल्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. फार कमी लोकांना माहित असेल की, आयुष्मानने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत एन्ट्री केला होता. (Social Media) इतकंच नाही तर, वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्याने स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली होती. आता अभिनेत्याला स्टार ऑफ द डेकेड’ (Star of the Decade Award) या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)


अभिनेत्याने सर्व पत्रकारांचे मनपूर्वक आभार मानले की, त्याच्या या प्रवासात आणि त्यानंतर आजच्या काळात त्याच्या यशाची कबुली देऊन त्याला मदत केली. आयुष्मान म्हणाला, “या पुरस्कारासाठी आणि या प्रमाणीकरणासाठी धन्यवाद. याचा अर्थ खूप मोठा आहे. हे खूप खास वाटत आहे. कारण मी या शहरात माझ्या डोळ्यांत स्वप्ने घेऊन आलो आणि मला मीडियाचा पाठिंबा, प्रेक्षकांचे प्रेम आणि या सर्व आश्चर्यकारक संधी मिळण्याचे भाग्य लाभले. मी नम्र आणि कृतज्ञ आहे.

तो पुढे म्हणतो “एक अभिनेता म्हणून मी नेहमीच वेगल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला आहे आणि यात जोखीम होती, पण मग रिस्क घेतल्याशिवाय मजा नाही. तुम्ही सर्व पत्रकार ब्रेकिंग न्यूज देन्यासाठी जोखीम पत्करली आहे आणि मला समोर आणण्यात आनंद आहे, निषिद्ध कथा, ज्या जोखमीच्या आहेत. मला असे वाटते की आयुष्य म्हणजे तुम्ही घेतलेल्या सर्व जोखमींची बेरीज आहे. आणि आज मी येथे आहे.. माझ्या देशाचा अभिमान बाळगणारा सर्वात जोखीम घेणारा अभिनेता बनण्याचा प्रयत्न करतो आहे.

Gaurav More : …म्हणून रसिकांना खळखळून हसवणाऱ्या गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी

दरम्यान, अभिनेत्याने 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर, आयुष्माननं ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘बधाई हो’, ‘अंधाधुन’, ‘ड्रीम गर्ल-2’ अशा अनेक कॉमेडी सिनेमामध्ये काम केलं. त्याच्या या सिनेमानं चाहत्यांकडून मोठी पसंती मिळाली. महत्वाचे म्हणजे, यामधील अनेक सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कार देखील देण्यात आला आहे. आयुष्मान खुराना उत्कृष्ट अभिनेत्यासोबत एक उत्तम गायक देखील आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज