Amruta Khanvilkar: ‘…म्हणून मला मास्टर्स करायचं, अभिनेत्रीने सांगितलं पुढचं पाऊल

Amruta Khanvilkar: ‘…म्हणून मला मास्टर्स करायचं, अभिनेत्रीने सांगितलं पुढचं पाऊल

Amruta Khanvilkar On Higher Education: अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘झी सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमातून 2004 मध्ये तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर 2006 मध्ये अभिनेत्रीने ‘गोलमाल’ हा तिचा पहिला चित्रपट केला. (Social Media) या चित्रपटामुळे अभिनेत्रीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. गेल्या काही वर्षांत अमृताने मराठीसह बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता ‘राझी’, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘मलंग’ नंतर लुटेरे मधून अमृताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं केलं. हॉटस्टारवरच्या या अफलातून वेब शो मधून अमृता बॉलीवूड (Bollywood) गाजवते आहे.

लुटेरे मधून “अविका” ची महत्त्वपूर्ण भूमिका साकारून तिने बॉलीवूड प्रेक्षकांना मोहित केलं आहे. सध्या वेब विश्वात अमृता खानविलकर हिच्या “लुटेरे”च्या चर्चा होत असताना अमृताने आता तिला पुढे काय करायचं याबद्दल प्रेक्षकांना एक छोटी हिंट दिली आहे. ही खास गोष्ट नक्की काय आहे ? हे बघायला सगळेच उत्सुक आहेत.

‘लुटेरे’ मधून बॉलीवूड आणि ओटीटी (OTT) दोन्ही विश्वात अमृता पुन्हा चर्चेत असताना तिच्या प्रभावशाली अभिनयाचं कौतुक होतंय. प्रत्येक कलाकाराला अभिनायच्या पलिकडे जाऊन आपण काहीतरी वेगळं करावं असं नक्कीच वाटून जात आणि असच काही अमृताच्या बाबतीत घडतंय. अमृता सध्या “लुटेरे” मध्ये अविकाची भूमिका साकारताना दिसत असली तरी तिच प्रमोशन दणक्यात सुरू आहे. अश्याच एका प्रमोशन दरम्यान अमृताने तिला आयुष्यात अजून काहीतरी खास करायचं आहे याबद्दल सांगितल.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाची 7 दिवसांत इतकीच कमाई, बजेटचा आकडा आहे खूपच मोठा

याबद्दल सांगताना अमृता म्हणते की,” अभिनय नवनवीन भूमिका प्रोजेक्ट्स सगळंच होत राहणार आहे पण मला अभिनयाच्या सोबतीने मास्टर्स सुद्धा करायचं आहे. मास्टर्स इन लिटरेचर किंवा इन फायनस हे अजून ठरवलं नाही, पण उच्च शिक्षण घेऊन ही एक मास्टर्स करण्याची माझी इच्छा आहे. आपण वर्षभर काम करत असतो पण स्वतः हासाठी काहीतरी करावं म्हणून मला मास्टर्स करण्याची खूप इच्छा आहे.

अमृता आगामी काळात अनेक हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्समध्ये दर्जेदार भूमिका करणार आहे. “कलावती” , “ललिता बाबर” पठ्ठे बाबूराव” या सारख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार तर आहे पण आता लुटेरेनंतर अमृता तिचं उच्च शिक्षण पूर्ण करणार का ? हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज