Amruta Khanvilkar: चंद्रमुखीचं मनमोहक रूप; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच तिच्या जबरदस्त फोटोंमुळे चर्चेत असते.

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या शेवटच्या प्रदर्शित झालेल्या 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटासाठी चर्चेत आहे.

अलीकडेच, या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत.

चंद्रमुखी चित्रपटानंतर अमृताच्या फॅन फॉलविंगमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. अमृताचे हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.

अमृता तिच्या प्रत्येक चित्रपटादरम्यान आपल्या फॅशनमध्येही बदल करत असल्याचं आपण पाहिलं आहे.

हेवी मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने तिचा हा लूक पूर्ण केलाय.

अमृताने पांढऱ्या रंगाच्या आकर्षक ब्ल्यू लूक्स ड्रेसवर नटून सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत.

डिप नेक ड्रेस परिधान करत अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट विशेष लक्षवेधी आहे.
