कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले निरीक्षणगृहातून पसार

पुणे : पुण्यात कोयता गॅंगचा धुडगूस या आता नित्याच्याच झाल्या आहेत. यातच या गॅंगमधील काही मुलांना अटक करण्यात आली होती. मात्र यातच एक मोठी व अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, हडपसर भागात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या […]

Untitled Design (67)

Untitled Design (67)

पुणे : पुण्यात कोयता गॅंगचा धुडगूस या आता नित्याच्याच झाल्या आहेत. यातच या गॅंगमधील काही मुलांना अटक करण्यात आली होती. मात्र यातच एक मोठी व अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झाले आहे.
Ganesh's Struggle Story : गणेशच्या जिद्दीची कहाणी तुम्हाला अवाक् करेल... : LetsUpp Marathi
याबाबत अधिक माहिती अशी, हडपसर भागात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या सात अल्पवयीन मुलांविरोधात हडपसर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर बालन्याय मंडळाच्या आदेशाने अल्पवयीन मुलांची रवानगी पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील निरीक्षणगृहात करण्यात आली होती. गंभीर गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात ठेवण्यात येते.

कोयता गॅंगमधील सात अल्पवयीन मुलांनी निरीक्षण गृहातील सीमाभिंतीवर शिडी लावून चढले. भिंतीवरून उड्या मारून पसार झाले. यामध्ये सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलांना पळून जाण्यासाठी मदत करण्यात आली होती.

या मुलांना मदत करणाऱ्या एका सराइताविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भाेसले व्हिलेज, भेकराईनगर, हडपसर) असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष किसन कुंभार (वय ४६) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंग जास्तच सक्रिय आहे. कोयता गँगच्या दहशतीची अनेक व्हिडीओ देखील समोर आली आहे. Of

Exit mobile version