शहाजीबापूंचा काही तासांत यू-टर्न; मंगेश चिवटेंच्या पाठिशी उभं राहताच महायुतीत नवा ट्विस्ट

Election : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवशहाजीबापू पाटलांच्या भूमिकेनं पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.

News Photo   2026 10 05T165033.759

Pune Graduate Constituency Election

Pune Graduate Constituency Election : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत (Election) महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उघड होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर पक्षाकडुन कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेनं या निर्णयाला आव्हान देत मंगेश चिवटे यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या पुण्यात शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत चिवटे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह शिंदे सेनेचे अनेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेकडुन चिवटेंच्या उमेदवारीची तयारी सुरू असतानाच शहाजीबापू पाटील यांच्या भूमिकेनंही राजकीय चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे. सकाळी त्यांनी मंगेश चिवटे यांना आपला पाठिंबा नसुन आपण शिवसेनेसोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, काही तासांतच त्यांनी आपली भूमिका बदलली आणि चिवटेंना पाठिंबा जाहीर केला. पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचं सांगत चिवटेंचा मनापासुन प्रचार करणार असल्याचंही शहाजीबापूंनी स्पष्ट केलं आहे.

स्मिता जाधव-पाटील पदवीधरच्या रिंगणात; भाजपकडून चाणक्य; सतेज पाटलांची कोंडी ?

दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांकडुन जोरदार दावे करण्यात आले होते. अखेर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी मिळाली. दुसरीकडे मागील निवडणुकीत विजयी झालेले शिक्षक आमदार जयंत तासगावकर यंदाही काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडुन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महायुतीतील जागावाटपावरुन निर्माण झालेला वाद आणि शिवसेनेची स्वतंत्र उमेदवारी याचा थेट परिणाम निवडणुकीच्या समीकरणांवर होण्याची शक्यता आहे.

भाजपकडुन माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनीही उमेदवारीची मागणी केली होती. मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेल्या सावंत यांना डावलुन चंद्रकांत पाटील यांच्या आग्रहानं कोल्हापूरचे कौस्तुभ गावडे यांना संधी देण्यात आली. आता शिवसेनेचे मंगेश चिवटे आणि दत्तात्रय सावंत हेही रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने भाजपसमोरची अडचण वाढली आहे. त्यामुळे जयंत तासगावकर, कौस्तुभ गावडे, मंगेश चिवटे आणि दत्तात्रय सावंत अशी चौरंगी लढत रंगण्याची शक्यता असून महायुतीतील मतविभाजनाचं गणित महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी महत्वाचं ठरु शकतं.

Exit mobile version