Kasba By Election : भाजप घेईल तो निर्णय आम्हांला.., शैलेश टिळकांचं स्पष्टीकरण

पुणे : भाजप जो काही निर्णय घेईल तो आम्हांला मान्य असल्याचं विधान दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज टिळक कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी ते बोलत होते. टिळक म्हणाले, आम्ही नाराज नसून पक्षाकडून जो काही आदेश दिला जाईल त्यांचं आम्ही पालन करणार आहोत. कसबा […]

Untitled Design   2023 02 06T213920.346

Untitled Design 2023 02 06T213920.346

पुणे : भाजप जो काही निर्णय घेईल तो आम्हांला मान्य असल्याचं विधान दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज टिळक कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी ते बोलत होते.

टिळक म्हणाले, आम्ही नाराज नसून पक्षाकडून जो काही आदेश दिला जाईल त्यांचं आम्ही पालन करणार आहोत. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारातही आमचं कुटुंब काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

टिळकवाडा ही लोकमान्य टिळकांची वास्तू असून आम्ही शेजारी राहत असल्याने अनेक लोकं पुष्पहार घालण्यासाठी येत असतात. तसेच आनंद दवे देखील आज लोकमान्य टिळक आणि दिवंगत मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेस हार घालण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. भाजपने टिळक कुटुंबियांना डावलून रासने यांनी उमेदवारी दिल्याने ब्राम्हण समाजात नाराजी पसरल्याचं बोललं जातंय.

टिळक कुटुंबियांना उमेदवारी नाकारल्याने हिंदू महासंघाचे आनंद दवे देखील निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे हिंदू मतदान फुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर महाविकास आघाडीकडून टिळक कुटुंबियांना उमेदवारी दिल्यास आम्ही निवडणूक लढवणार नसल्याचं सांगण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिलीय. तर निवडणूक होणारच नसेल तर आम्ही टिळकांना उमेदवारी देणार असल्याची भूमिका बावनकुळेंनी स्पष्ट केलीय.

दरम्यान, आमच्यात कोणतीही नाराजी नसून पक्षाकडून जो निर्णय देण्यात येईल तो आम्हांला मान्य असल्याचं स्पष्टीकरण शैलेश टिळक यांनी दिलंय.

Exit mobile version