ओडिसी नृत्य कनिष्ठ गटात शाल्वी चौगुलेचा प्रथम क्रमांक ध्रुव ग्लोबल स्कूलसाठी अभिमानस्पद

Shalvi Chougule नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सहावीतील विद्यार्थींनी शाल्वी चौगुले हिने ओडिसा नृत्य कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक मिळविला.

Dhruva Global School

Dhruva Global School

पुणे : भगवान जगन्नाथाच्या कथा सादर करणे आणि त्यांची स्तुती करणारे ओडिया नृत्य सादर करुन नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या (Dhruva Global School) सहावीतील विद्यार्थींनी शाल्वी चौगुले (Shalvi Chougule) हिने ओडिसा नृत्य कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्या संगीता राउतजी यांनी शुभेच्छा दिल्या.

अखिल नटराजन आंतर सांस्कृतिक संघ, नागपूर व आंतरराष्ट्रीय नृत्य परिषद सीआयडी पॅरिस-फ्रान्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक परफॉमिंग आर्टस चॅम्पियनशिप-सीझन ५ मध्ये शाल्वी चौगुलेने प्रथम क्रमांक पटकाविला. सुभश्री राउतराय यांच्या मार्गदर्शनाखाली ओडिया नृत्याचे सादरीकरण केले होते. ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परफॉर्मिंग आर्टस स्पर्धा आणि महोत्सवात या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाल्वीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले (Shalvi Chougule’s first position in the junior category of Odissi dance)

हा पुरस्कार विद्यार्थ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि यामुळे संपूर्ण शहरात शास्त्रीय शैलींची ओळख निर्माण होण्यास मदत होईल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे नृत्य नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Exit mobile version