Download App

एकत्र जेऊन मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् बाहेर पडताच गोळ्या झाडल्या

  • Written By: Last Updated:

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) आज (दि.5) दुपारी गोळीबारात हत्या करण्यात आली.
त्यानंतर आता हत्या करणाऱ्या पहिल्या आरोपीचे नाव समोर आले आहे. मोहोळची हत्या त्याचाच साथीदार असणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, हत्येपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपींनी मोहोळ याच्या घरी एकत्र जेवण केल्याची माहिती समोर आली आहे. (Gangster Sharad Mohol Murder In Pune)

Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळचा ‘गेम’ करणाऱ्या एका आरोपीचे नाव अन् फोटो आला समोर

नेमकं काय घडलं?

शरद मोहोळ याची आज भर दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून, आता या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी मोहोळच्या घरी एकत्र जेवण केले होते.आज मोहोळच्या लग्नाचा आज वाढदिवस होता.जेवण झाल्यानंतर हे सर्व बाहेर पडले होते.

कुख्यात गुंड मोहोळची हत्या कुणी केली ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट तपासाची दिशाच सांगितली !

शरद मोहोळ पुढे तर आरोपी त्याच्या मागून चालत होते. त्यावेळी मागून चालणाऱ्या आरोपींनी त्यांच्याकडील बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. यात आरोपींनी चार राऊंड फायर केले त्यातील पहिली गोळी पायाला, दोन गोळ्या पाठीवर लागल्या. त्यावेळी कुणी हल्ला केला हे बघण्यासाठी शरद मोहोळ मागे वळला असता आरोपींनी चौथी गोळी झाडली जी मोहोळच्या थेट छातीवर लागली. या सर्व घटनेत शरद मोहोळ गंभीर झाला होता. त्यानंतर त्याला तत्काळ जवळ असणाऱ्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्या आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बोळीतून आले, चार राऊंड फायर अन् पसार; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

भर दुपारी खून झाल्याने खळबळ 

कोथरूड परिसरातील सुतारदरा दवाखाना परिसरात शरद मोहोळवर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास मोहोळवर 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला कोथरूड परिसरातील एका खासगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झाला. भर दुपारी अशा प्रकारची घटना घडल्याने मोठी दहशत परसली असून, हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानंतर आता मोहोळचा खून त्याच्याच साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

शरद मोहोळ खून प्रकरण : शेलार गॅंगची एक धमकी गॅंगवारसाठी ठरली ठिणगी..?

कोण आहे शरद मोहोळ?

मोहोळने येरवडा कारागृहात विवेक भालेरावच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी कतील सिद्दीकीचा खून केला होता. या प्रकरणात जामीनही मिळाला होता. जुलै 2022 मध्ये मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपारही करण्यात आले होते. शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक  गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोहळला पिंटू मारणे हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र, दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणात त्याला पुन्हा अटक झाली होती.

follow us