Download App

“सुटका तर नाहीच पण, त्यांना माफीही नाही”, मंगेशकर रुग्णालय प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

या प्रकरणात डॉक्टरांची चूक आहेत. पण मी आजही म्हणते की ही हत्याच आहे अशा शब्दांत सुळे यांनी मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

Supriya Sule on Mangeshkar Hospital : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तनिषा भिसे मृत्यूप्रकरणावर भाष्य करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणात डॉक्टरांची चूक आहेत. पण मी आजही म्हणते की ही हत्याच आहे अशा शब्दांत सुळे यांनी मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानकडे जाणाऱ्या दीड किलोमीटरच्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. हा रस्ता काँक्रीटचा करावा या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी पत्रकारांनी त्यांना तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाबाबत विचारले असता त्यांनी मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर जोरदार टीका केली.

सुळे म्हणाल्या, या प्रकरणात निश्चितच डॉक्टरांची चूक आहे. ही हत्याच आहे. कारण ती महिला साडेपाच तास कळा देत होती. तरी तुम्ही तिला तयारी करुन दुसऱ्या रुग्णालयात पाठवता. यामध्ये व्यवस्थापनातील चार ते पाच लोकही सहभागी आहेत. यामुळे या प्रकरणात आता कुणाचीच सुटका नाही. जो कुणी यात सहभागी आहे त्याला माफी नाहीच, असा इशारा त्यांनी दिला.

Deenanath Mangeshkar Hospital : गर्भवती महिलेचा मृत्यू नव्हे तर हत्याच; सुप्रिया सुळे आक्रमक 

धर्मादाय आयुक्तांचा अहवालही सादर

गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Tanisha Bhise Case) चर्चेत आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी सुरू केली आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालात काय आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु, या प्रकरणात एकूणच रुग्णालय प्रशासनाची भूमिका वादग्रस्त राहिली आहे.

follow us