Sharad Pawar Hospitalized: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्यामुळे शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता त्यांना पुन्हा रुग्णालयात जावे लागले आहे.
We are admitting Baba to Breach Candy Hospital for further tests. Thank you all for your concern and good wishes. 🙏
— Supriya Sule (@supriya_sule) November 4, 2026
दरम्यान, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांना तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
