Pune News : राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मात्र त्याआधीच फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत महायुतीत इनकमिंग वाढली आहे. परंतु, आज पुण्यात वेगळीच घडामोड घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 100 कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. या कार्यकर्त्यांनी महायुती नाही तर चक्क महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही लक्षवेधी घटना आज घडली.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चार महिन्यात पु्णे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने या पक्षप्रवेशाला महत्व प्राप्त झालं आहे. शरद पवार गटाची ताकद वाढली आहे तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला खिंडार पडलं आहे. पक्षबांधणीसाठी नव्याने प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंसाठी (Raj Thackeray) हा धक्का मानला जात आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी तीन शब्दांत दिलं उत्तर…
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections 2025) घोषणा होऊ शकते. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने (Election Commission) तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षही जोमाने कामाला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला जात आहे. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यांची पाठ फिरताच मनसेला मोठं खिंडार पडलं आहे.
पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते रोहन गायकवाड यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. आजमितीस पुण्यात मनसेचा एकही आमदार नाही. येथील स्थानिक नेते वसंत मोरे यांनीही काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यामुळे आता पुण्यात मनसेची अवस्था अतिशय दुबळी झाली आहे. अशा परिस्थितीत पक्षाला महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. नगरसेवक निवडून आणण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर उभे ठाकले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नागालँडच्या सातही आमदारांना अजित पवारांना पाठिंबा दिला होता. 2023 मध्ये झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पक्षाचे 7 आमदार निवडून आले होते. परंतु, आता या सातही आमदारांनी सत्ताधारी एनडीपीपी आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
मोठी बातमी! नागालँडमधील 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ; सत्ताधारी एनडीपीत सामील