पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढली; माजी नगरसेवक राहुल कलाटे यांचा भाजपात जाहीर प्रवेश

पिंपरी-चिंचवड शहरात त्यांचे मजबूत संघटनात्मक जाळे असून, विविध सामाजिक व नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.

Rahul Kalate

Rahul Kalate

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडत असून, शहरातील प्रभावी नेतृत्व, माजी नगरसेवक व महापालिकेतील माजी गटनेते राहुल तानाजी कलाटे (Rahul Kalate) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश मुंबई येथे पार पडत आहे.

मोठी बातमी! प्रशांत जगताप यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम, नक्की काय घडलं?

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक लढवून विजयी उमेदवारांना तगडे आव्हान देणारे राहुल कलाटे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या प्रभावी मताधिक्याने आणि भक्कम जनाधाराने संपूर्ण शहरात राजकीय चर्चेला उधाण आले होते. पिंपरी-चिंचवड शहरात त्यांचे मजबूत संघटनात्मक जाळे असून, विविध सामाजिक व नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.

Video : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांसह अनेकांनी हाती घेतलं कमळ

हा निर्णय माझ्या लोकांच्या विकासासाठी, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेत असल्याचे कलाटे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यात विकासाची नवी दिशा मिळत असून, त्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. राहुल कलाटे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असून, आगामी काळात शहराच्या विकासासाठी भाजप अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Exit mobile version