Rohini Khadse on Rupali Chakankar : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात (Vaishnavi Hagawane Death Case) चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. तर सासरा आणि दीरालाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.
रोहिणी खडसे यांनी आज या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. खडसे पुढे म्हणाल्या, वैष्णवीच्या प्रकरणात संशय यावा असा प्रकार आहे. या प्रकरणात पोलिसांनी अगदी सौम्य प्रकारची कलमे लावली आहेत. वैष्णवीच्या शरीरावर 19 खुणा आहेत. त्यासंदर्भात कलमे लावणे गरजेचे होते. आमचं म्हणणं आहे की ही आत्महत्या नाही तर हत्याच आहे. हत्येचे कलमही आरोपींवर लावणे गरजेचे आहे. परंतु, आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला.
अजितदादा हगवणे प्रकरणावर बोलताना गंभीर नव्हते; पत्रकाराचा प्रश्न अन् फडणवीस दादांसाठी बनले ‘ढाल’
या प्रकरणात पोलीस नेमकं काय करत आहेत. पोलिसांकडून निष्काळजीपणा होत आहे. राजकीय पाठबळ असल्याशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाहीत. महिला आयोगाकडे तक्रार नियोजन होते तर मग त्यांनी काय केलं. महिला आयोगाच्या अध्यक्षांना (रुपाली चाकणकर) पक्षाच्या कार्यक्रमाला जायला वेळ मिळतो. आयोगाला चोवीस तास वेळ देईल अशाच व्यक्तीला अध्यक्ष केलं पाहिजे. पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे आयोगाचं अध्यक्षपद नसलं पाहिजे. या प्रकरणी जर आयोगाच्या अध्यक्षांनी वेळीच दखल घेतली असती तर आज वैष्णवी जिवंत दिसली असती असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी वैष्णवीचा सासरच्या लोकांनी शारिरीक आणि मानसिक छळ केला होता. त्यामुळेच वैष्णवीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांकसह सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीत येत्या 26 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र, दीर सुशील यांनाही आज (शुक्रवार) अटक करण्यात आली.
Video : अंजली दमानियांकडून पवार कुटुंबावर ट्वीट’वार; करिश्मा हगवणेबरोबर सुनेत्रा पवार अन्…