Sharad Pawar Parties MLA Bapu Pathares son will Entered in BJP : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षांतरं सुरू झाली आहेत. यामध्ये आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार बापू पठारे यांचा मुलगा, पुतण्या आणि भाचा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ज्या पुण्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाला एकमेव आमदार मिळाला तेथेदेखील पक्षाला सुरूंग लागण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणे महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. मात्र विधानसभेला तसं झालं नाही. यामध्ये पुणे या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये देखील अजित पवार आणि शरद पवार दोन्ही राष्ट्रवादींना जेमतेम एक-एक आमदार मिळाले होते. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे, भाचा संतोष भरणे आणि पुतण्या महेंद्र पठारे हे भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दसऱ्याच्या मुहुर्तावर हा पक्षप्रवेश होणार असल्याचंदेखील बोललं जात आहे.
रितेश देशमुखच्या उपस्थितीत ‘वडापाव’चा धमाकेदार ट्रेलर लाँच!
दरम्यान पठारे हे मुळचे भाजपचेच आहेत. त्यांनी विधानसभेच्या वेळी शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांना तिकीट मिळालं आणि त्यांनी अजित पवारांच्या पक्षाच्या सुनील टिंगरे यांचा पराभव केला. मात्र त्यांची महायुतीशी जवळीक असल्याचं स्पष्ट दिसलेलं आहे. ते अजित पवारांच्या व्यासपीठावर दिसलेले आहेत. त्यानंतर आता त्यांचे पुत्र हे भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दुष्काळी मराठवाड्यात जलप्रलय! धाराशिवमध्ये ढगफुटी, लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढलं