ब्रेकिंग : अखेर प्रशांत जगताप यांचा पवारांना ‘जय महाराष्ट्र’; राजीनामा दिल्याची पोस्ट करत घोषणा

आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार !

Prashant Jagtap

Prashant Jagtap

Prashant Jagtap Resign Sharad Pawar NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध करणाऱ्या पवारांचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी अखेर पवारांना जय महाराष्ट्र केला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभारही जगताप यांनी म्हटले आहे.

भाजप-मनसेचं Video War; राज यांच्या आधीच अमित साटम यांनी ‘तो’ व्हिडिओ पुढे आणला…

पुरोगामी विचारांसाठी लढत राहणार

२७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल !  आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार !

 

सुप्रिया सुळेंची मध्यस्थीला अपयश

अजित पवारांसोबत युती केल्यास मी राजीनामा देईल असा थेट इशारा जगताप यांनी दिला होता. त्यानंतर काल (दि.23) सुप्रिया सुळेंनी जगताप यांना तातडीने मुंबईत चर्चेसाठी बोलावले होते. त्यानंतर सुळे आणि जगताप यांच्यात तब्बल 6 तास खलबतं झाली होती. त्यानंतर जगताप यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही किंवा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडेही राजीनामा दिल्याची कल्पना नसल्याचे सांगितले होते. तसेच आज पुण्यात बोलतानाही सुळेंनी गेल्या 48 तासांत माझ्याकडे कोणताही राजीनामा आला नसल्याचा पुनुरूच्चार केला होता. मात्र, अखेर सुळेंसोबत सहा तासांच्या चर्चेनंतरही जगतापांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम केल्याने त्यांच्या मध्यस्थिला अपयश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Video : देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला आहे अन् मरेल…; राज ठाकरेंना थेट प्रत्युत्तर

प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष होते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा सामना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांच्याशी झाला आहे. तुपेंना 1 लाख 34 हजार 810 मतं मिळाली होती, तर प्रशांत जगताप यांना 1 लाख 27 हजार 688 मतं पडली होती. जेमतेम सात ते आठ हजार मतांच्या फरकाने जगतापांना पराभव स्वीकारावा लागला होता.

Exit mobile version