Download App

यंत्रणांचा गैरवापर टाळायचा असेल तर सरकारला सोशल मीडियातून ठोका; पवारांचा सल्ला

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांनी राज्यात आणि देशात सुरू असलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. हा भारतीय जनता पक्षाकडून (BJP) व्यवस्थेचा होणारा गैरवापर टाळायचा असेल तर सोशल मीडिया हाच पर्याय असल्याचं सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला ठोकून काढा, असं ते म्हणाले.

आज कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी देशात सुरू असलेल्या धार्मिक वादाचा मुद्दा उपस्थित केला. आम्हाला देशात धार्मिक युद्ध नको आहे, दंगली नको आहेत, आम्ही शांततेचे उपासक आहोत. आम्ही लोकांच्या समतेचा आग्रह करणारे लोक आहतो. जर सरकारी यंत्रणा असं करत असेल तर, ते आम्हाला मंजूर नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आटोक्यात आणता येऊ शकतं. जर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांच्यावर हल्ला केला तर राज्यकर्ते हे परत करण्याआधी विचार करतील, असं पवार म्हणाले.

केशुभाईंची खुर्ची गेली, मनमोहनसिंगांचं सरकार वादात आलं… आता गडकरी रडारवर : CAG आहे तरी काय? 

तुम्ही जागरूक असलं पाहिजे. रोज काय घडतंय, याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यात जर तुमच्यातील एकावर हल्ला झाला, तर तुमच्यातल्या 50 जणांना त्याला उत्तर दिलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही अधिक संखेनं उत्तर द्याल तेव्हा,तुमच्यावर हल्ला करणारे शंभर टक्के थांबतील. आज भारतीय जनता पक्ष आणि त्याचा संपूर्ण दृष्टीकोन हा यंत्रणेचा गैरवापर करणं आणि ते उध्वस्त करणं ही भूमिका घेऊन राज्य करतात. ही भूमिका तरूण पीढीच्या भल्याची नाही, राज्याच्या भल्याची नाही. हे टाळायचं असेल तर सोशल मीडिया हाच पर्याय आहे. सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करू नका, आपलं काय सुरू आहे, विरोधकांचे काय चालले आहे, यासाठी सोशल मीडियाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

अजित पवारांनी बंड केलं आणि ते सत्तेत सहभागी झाले. या बंडखोर आमदारांविषयी पवारांनी मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, आपल्यातले काही लोक विकासासाठी भाजपसोबत गेल्याचे सांगतात, पण त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही. ईडीच्या कारवाईच्या भीतीने काही सहकाऱ्यांनी मार्ग बदलला आणि आज ते भाजपमध्ये दाखल झालेत. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम सुरू आहे. सत्तेचा गैरवापर होत आहे.

Tags

follow us