Download App

Sharad Pawar Retirement : साहेब पदाधिकारी निवृत्त होत असतात..; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बॅनरबाजी

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Retirement NCP Banners In Pune : ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी काल (ता. 2 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताच राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवारांच्या या निर्णयाला जोरदार विरोध करत आपण आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनवणी आणि घोषणा दिल्या. अशाचं प्रतिक्रिया राज्यभर उमटत होत्या. पवारांच्या या घोषणेनंतर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्त्यांनी पवारांसमोरच निर्णय मागे घेण्यासाठी तब्बल सहा तास आंदोलन केलं या राजकीय नाट्यावर अखेर मला विचार करायला 2-3 दिवस द्या, असा निरोप कार्यकर्त्यांना पाठवत पडदा पडला.

https://letsupp.com/maharashtra/maharashtra-ias-transfer-41863.html

दरम्यान, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात पवारांना आपला निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलन सुरु केले. पुणे, धाराशिव येथे तर राजीनामा सत्रदेखील सुरु झाले आहे. त्यानंतर अजूनही राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी दबाव वाढत आहे. पुण्यात यासाठीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

संजय राऊत हे आधुनिक शकुनी मामा; नितेश राणेंचा हल्लाबोल

पुण्यातील बॅनरवर काय?
पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पुण्यात विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहे. यावर ‘साहेब पदाधिकारी निवृत्त होत असतात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे. अशा स्वरूपाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच आज महाराष्ट्रच नव्हे तर, अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे. साहेब कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी…’ अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष समीर उत्तरकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर चिटणीस अमित खानेकर यांनी लावले आहेत.

Sanjay Shirsat : पवारानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार हेच योग्य

पवारांच्या राष्ट्रीय अध्यपदावरून निवृत्त होण्याच्या निर्णयानंतर सध्या राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी शरद पवारांवर दबाव वाढत आहे. त्यामुळे शरद पवार कार्यकर्त्यांच्या दबावानंतर आपला निर्णय बदलतात की आपल्या निर्णयावर ठाम राहतात यावर राज्याच्या पुढील राजकीय नाट्यमय घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Tags

follow us