Ajit Pawar on Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जत येथील पक्षाच्या मेळाव्यातून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच काही गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की बऱ्याच गोष्टी मलाही पहिल्यांदाच माहिती झाल्या आहेत. त्यामध्ये बरेच स्फोट होते पण स्फोट होता का? बॉम्ब होता का? फटाकडा होता का? अजून काही होतं का? या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असा टोला शरद पवार यांनी लागवला.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर गाफील ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर शरद पवार म्हणाले की माझ्याकडून त्यांना कधी बोलवण्यात आले नव्हते. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षातील कोणत्याही सदस्याला माझ्याशी संवाद ठेवण्याचा अधिकार आहे. त्यावेळी अनेक लोक लपवत होते. त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्याची चर्चा झाली होती. ते ज्या रस्ताने जाण्याचा विचार करत होते. तो विचार आम्हाला लोकांना मान्य नव्हता असे शरद पवार यांनी सांगितले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत लोकांना आम्ही मतं मागितली होती ती मतं भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. ती एका विशिष्ट कार्यक्रमासाठी होती. एवढंच नाही तर भाजप आणि त्यांच्या विचारधारेविरोधात होती. आमच्या भूमिकेला लोकांचा पाठिंबा होता म्हणून आमचे लोक निवडून आले. त्यामुळे जो कार्यक्रम मांडला, भूमिका मांडली त्याच्याविरुद्ध काही सूचविले असेल तर ती लोकांशी फसवणूक आहे. त्यामुळे ते करणे योग्य नाही अशी भूमिका माझ्यासह अनेक सदस्यांची होती, असे शरद पवार यांनी सांगितले.