Chinchwad By Election : शिवसेना कारवाई करणार?, राहुल कलाटेंनी स्पष्ट सांगितलं

पुणे : मी एक शिवसैनिकच आणि गटनेताही आहे, पक्ष माझ्यावर कारवाई करेल, असं मला वाटतं नसल्याचं पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी स्पष्ट केलं आहे. मी याआधीह अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेली असून त्यावेळी पक्षाने माझ्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती, त्यामुळे आताही पक्ष माझ्यावर कारवाई करेल असं मला वाटत नसल्याचंही त्यांनी म्हटंलय. येत्या 27 फेब्रवारीला […]

Untitled Design (35)

Untitled Design (35)

पुणे : मी एक शिवसैनिकच आणि गटनेताही आहे, पक्ष माझ्यावर कारवाई करेल, असं मला वाटतं नसल्याचं पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी स्पष्ट केलं आहे. मी याआधीह अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेली असून त्यावेळी पक्षाने माझ्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती, त्यामुळे आताही पक्ष माझ्यावर कारवाई करेल असं मला वाटत नसल्याचंही त्यांनी म्हटंलय.

येत्या 27 फेब्रवारीला पुण्यातील दोन्ही जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. पिंपरी चिंचवड मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल कलाटे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट असतानाच अचानक नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आल्याने राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Chinchwad By Election : राहुल कलाटे कुणाचं आव्हान मानतात अश्विनी जगताप की नाना काटे?

कलाटे यांच्या बंडखोरीवर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या मनधरणीनंतर ते माघार घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या मात्र, राहुल कलाटे कोणत्याही आश्वासनांना बळी न पडता त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Mahesh Aher यांच्या केबिनमधील पैशांच्या थप्प्यांचा व्हिडीओ आव्हाडांनी केला ट्वीट; नेटकरी म्हणाले, “ईडी…”

कलाटे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच आम्ही कलाटेंची मनधरणी करत असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.

अखेर अर्ज माघे न घेता राहुल कलाटे आता निवडणुकीला सामोरे जात असून त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा देखील जाहीर करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राहुल कलाटे यांनी वंचित पुणे शहर कार्यकारिणी आणि प्रकाश आंबेडकरांचं धन्यवाद मानत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय.

Exit mobile version