Mahesh Aher यांच्या केबिनमधील पैशांच्या थप्प्यांचा व्हिडीओ आव्हाडांनी केला ट्वीट; नेटकरी म्हणाले, “ईडी…”

Mahesh Aher यांच्या केबिनमधील पैशांच्या थप्प्यांचा व्हिडीओ आव्हाडांनी केला ट्वीट; नेटकरी म्हणाले, “ईडी…”

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यात जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा उल्लेख आहे. क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. ही क्लिप ठाणे महापालिका (Thane Municipality) सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) या अधिकाऱ्याची असल्याचं सांगण्यात येत आहे.

यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना मारहाण केली आणि त्यांच्या महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे श्री. म्हाडसे ह्या व्हिडीओ मध्ये पैसे मोजताना दिसत आहेत, हा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवर शेअर केला आहे, आता या व्हिडिओवर नेटकऱ्यानी चांगलीच खिल्ली उडवली आहे, त्यांच्या या व्हिडिओ पाहून, आव्हाड साहेब काळजी नसावी क्लीनचीट चे पत्र ऑलरेडी टाईप करण्याच्या ऑर्डर गेल्या सुद्धा असतील…ED कडे रीतसर तक्रार करा, महेश आहेर चोर आहे…..,सामान्य जनतेचे पैसे लुटणार हरामखोर…अशा रीशवतखोर हरामी अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे.., या सहाय्यक आयुक्त महेश आहेर त्याच्या संपत्तीची चौकशी करून याला जेलमध्ये टाकले पाहिजे. अशा प्रकारचे कॉमेंट्स सध्या नेटकरी करत आहेत.

काय आहे प्रकरण ? 

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केला आहे, अशा संभाषणाची एक क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमधील संभाषण सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

महेश आहेर यांना मारहाण 

ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर महेश आहेर हे सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षारक्षकही होते. पण, पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना मारहाण केली. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला मारण्याची धमकी देतो का? असे बोलत कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube