Download App

Amit Shah : शिवसृष्टी पूर्ण होतेय, बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न साकारतंय

  • Written By: Last Updated:

पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं सगळं आयुष्य छत्रपती शिवराय या एका विषयावर खर्ची घातलं. आज पुरंदरे हे आपल्यात नाहीत मात्र त्यांचं अधुरं स्वप्न साकार होतं आहे. शिवसृष्टीचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते आज पूर्ण होतं आहे. तसेच या शिवसृष्टीचं राहिलेलं कामही लवकरच पूर्ण होईल असाही विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या (Shivsrushti) संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज पुण्यात आले होते. यावेळी शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न साकार होत असल्याचे म्हंटले आहे.

आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण साजरी करतोय. तसेच आजच्या दिवसालाच आपण शिवसृष्टीचं लोकार्पण देखील करतो आहे. मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे हे माझं भाग्य आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवरायांना मी कोटी कोटी नमस्कार करतो. देशासाठी आणि राज्यासाठी जे योगदान शिवरायांनी दिलं ते अतुलनीय असून मी त्यांना वंदन करतो असं शाह यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना शाह म्हणाले, शिवसृष्टीचा प्रकल्प 438 कोटींचा आहे. याचा पहिला टप्पा सुरू होतो आहे. चार टप्पेही दिलेल्या वेळात पूर्ण होतील याचा मला विश्वास आहे. पहिल्या टप्प्यात शिवकालीन इतिहासातले अनेक प्रसंग आहेत. आग्र्याहून सुटका, शिव राज्याभिषेक यासारखे अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत.

Twitter Blue Tick : शिवसेनेच्या ट्विटर हँडलचं ब्ल्यू टिकही गेलं

महाराजांविषयीचं सगळं लिखाण वाचणं शक्य नाही. पण इथे जी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला शिवराय कळतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांचे विचार हे लोकांना समजणं खूप आवश्यक आहे. तेच काम या माध्यमातून होईल असा मला विश्वास वाटतो आहे. 3D आणि 4D अद्यावत तंत्रज्ञान वापरून आणि इतिहास जिवंत करण्याचा उत्तम प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. जगभरातल्या इतिहासप्रेमींसाठी, शिवप्रेमींसाठी हे ठिकाण महत्त्वाचं असणार आहे.

Tags

follow us