Uddhav Thackeray Speech in Pune : उद्धव ठाकरे आज पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात भाजप, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांवर जोरदार बरसले. काही दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना एकतर ते तरी राजकारणातील राहतील नाहीतर मी तरी असं आव्हान दिलं होतं. त्यांच्या या आव्हानानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या राजकीय ड्राम्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा फडणवीसांना डिवचलं. मी ढेकणांना आव्हान देत नाही. ढेकणांना अंगठ्यानं चिरडायचं असतं त्यांना काय आव्हान द्यायचं, अशा शब्दांत प्रहार केला.
“एकतर तू तरी राहशील नाहीतर मी” उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट ललकारलंच
मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी आव्हान द्यावं इतका मोठा तू नाहीस. काही जणांना वाटलं की मी त्याला आव्हान देतोय. तर हे आव्हान चोर दरोडेखोरांच्या पक्षाला आहे. तुझ्या नादाला लागण्याची तुझी औकातच नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केली. पुण्यातला पूर एका विभााचा नाही. या पुरात हजारो संसार उद्धवस्त झाले. ही निसर्गनिर्मित घटना नाही. यात आपणही कुठेतरी चुकतोय. गुन्हे घडत आहेत. हे जे गुन्हेगार आहेत त्यांना उलटं लटकवण्यासाठीच आपल्याला जिंकायचं. हा विषय पुणेकरांचा आहे. विकासाच्या नावाखाली शहराची किती हानी होणार हे सुद्धा राज्यकर्त्यांनी दाखवलं पाहिजे.
पुण्यात मुळा मुठा नदी आहे. पुण्यात एकदा भाजपाचे व्यंकय्या नायडू आले होते. त्यावेळी त्यांनी नदीचं नाव विचारलं. कुणीतरी मुळा मुठा सांगितलं. त्यावर नायडू म्हणाले असं कुठं नाव असतं का. मग काय आता नदीचं नाव मोदी नदी ठेवायचं का. ते नदीचं नाव बदलू शकत नाहीत पण नदीचा म्हणून आता नदीचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आता पुणे शहर वाचवायचंय म्हणून आपल्याला जिंकायचं आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मी पुण्याच्या विकासात कधी दखल दिली नाही. कारण येते सुभेदार बसले होते. नदीचा प्रवाह बंद केला त्यामुळे पाणी लोकांच्या घरात घुसलं असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
अयोध्येतील राम मंदीर गळतंय. संसद भवन गळतंय. कारण संसद भवन बांधणारा काँट्रॅक्टर गुजरातचाच असल्याची माझी माहिती आहे. एक वर्ष झालं बांधकामाला. मोदी अजूनही काँग्रेसला हिशोब मागतात. संसद भवनाचा हिशोब आधी द्या. तुमचं सगळंच गळतंय मग याला गळती सरकार म्हणायचं. आमचं पाप यांना (भाजप) आम्ही हिंदुत्वाच्या वेडापायी पाठिंबा दिला होता असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते.. अमित शाहांचा घणाघात
काही दिवसांपूर्वी त्यांचा कार्यक्रम पुण्यात झाला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने इतके फटके दिले. त्या फटक्यांचे वळ पाहण्यासाठी ते महाराष्ट्रात आले होते. कोण आले होते तर अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा आले होते. इकडे वळवळायला आला होता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतोय. कशासाठी आम्ही हिंदुत्व सोडू. तुम्ही आमच्याशी विश्वासघात केला. तु्म्ही हिंदू आहात की नाही हे आधी सांगा. सत्तास्थापनेसाठी जम्मू काश्मिरात मेहबुबा मुफ्तींबरोबर सरकारमध्ये बसणारी भाजप आहे. आताच्या सरकारमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार आहेत, ही काय हिंदुत्ववादी माणसं आहेत का? तुमच्या सत्तेसाठी तुम्ही पक्ष चोरता, माणसं फोडता. हा तुमचा सत्ता जिहाद आहे. सत्तेसाठी काहीपण करायला तुम्ही तयार असता अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली.