Shooting outside Shivajinagar Court in Pune; a man brutally killed using a pistol and sharp-edged weapons : नेहमीच कोणत्या ना कोणत्या गुन्हेगारीच्या घटना पुणे शहरात घडत असतात. त्यातच आता तर थेट शिवाजीनगर येथील कोर्टाच्या चेंबर क्रमांक 63 च्या बाहेर चार अज्ञात व्यक्तींनी दोन पिस्तुलांचा वापर करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. पिस्तुलातून गोळी झाडताना फायरिंग फेल झाल्यानंतर त्यांनी कोयत्याने वार करून संबंधित व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीवर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अखिलेश, काँग्रेसला ‘भिकारी’ समजला का?; युपीत BJP ला घरी पाठवणाऱ्यांमध्येचं जुंपली…
सहा जणांच्या टोळक्याने या तरुणाला लक्ष्य करत आधी गोळीबार केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने अनेक वार करण्यात आले. टोळीयुद्धातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला झाला त्यावेळी न्यायालयाच्या परिसरात अनेक वकील उपस्थित होते. त्यापैकी तांबे नावाच्या एका वकिलाने संपूर्ण घटना पाहिली. त्यांच्या सांगण्यानुसार, हल्लेखोरांच्या तावडीतून वाचण्यासाठी जखमी तरुण न्यायालयाच्या आवारात धावत होता. हल्लेखोरांपैकी एकाकडे रिव्हॉल्व्हर, तर दोघांकडे कोयते होते. गोळी लागल्यानंतरही तरुणाने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतर गेल्यानंतर तो घाबरून खाली बसला.
Ahilyanagar LCB : अहिल्यानगरातील घरफोडीचे दोन गुन्हे उघड; हिंगोलीच्या आरोपीला अटक
जीव वाचवण्यासाठी या तरुणाने दोन्ही हात डोक्याभोवती धरून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही हल्लेखोरांनी त्याला सोडले नाही. दोघांनी कोयत्याने त्याच्या हातांवर जोरदार वार केले. या हल्ल्यात त्याचे दोन्ही हात गंभीररीत्या जखमी झाले. एका हाताचा पंजा मनगटापासून जवळपास तुटून लोंबकळत असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यांच्याकडे सुझुकी अॅक्सेस आणि अॅक्टिव्हा अशा दोन दुचाकी होत्या. अॅक्सेसवरून चौघे, तर अॅक्टिव्हावरून दोघे अशा सहा जणांनी घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण काही वेळाने उठून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर तो अचानक जमिनीवर कोसळला. रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेल्या या तरुणाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वेदनांनी विव्हळत असलेला तरुण गर्दीकडे डोळ्यांची उघडझाप करत पाहत होता. घटनास्थळावरील हे दृश्य उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारे होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणाला रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याने शहरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
