Download App

Shri Shri Ravishankar करणार नाही आणि करु देणारही नाही, तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

पुणे : आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनसह (Art OF Living Foundation) विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्युयूथ मीट हा कार्यक्रम कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे आयोजित केला होता. त्यामध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले. ‘करणार नाही आणि करु देणारही नाही,’ अशी शपथ घेत पुण्यातील १ लाख २३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

याप्रसंगी नॅकचे अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राजेश पांडे, माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजेश शास्तारे, एज्युयूथ मीटचे प्रमुख हिमांशू नगरकर, शेखर मुंदडा उपस्थित होते. नव्या शैक्षणिक धोरण व तणावमुक्त शिक्षणासंदर्भात यासंदर्भात श्री श्री रविशंकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यावेळी झाला.

वर्षानुवर्षे आपण आंधळेपणाने शिक्षण घेत आहोत. जुन्या अभ्यासक्रमातील प्रचंड माहितीच्या ओझ्याने आपण दबले गेले आहोत. ज्याचा आपल्याला व्यावहारिक आयुष्यात काहीच उपयोग होत नाही. मोबाईलच्या एका क्लिकवर सगळी माहिती उपलब्ध असते. त्यामुळे रट्टे मारण्याला आता काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांमधील प्रतिभेला जागृत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण उपयोगी ठरेल. प्रत्येक विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था आनंदाचे, नवनिर्मितीचे कॅम्पस झाले पाहिजे. नवीन शैक्षिणक धोरण हे क्रांतिकारक पाऊल आहे, असे मत आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.

श्री श्री रविशंकर म्हणाले, भारताला नशामुक्त तरुणाईच करू शकते. यासाठी तरुणांनी नवीन उत्साह आणि उमंग सोबत घेऊन चालायचे आहे. प्रत्येक गोष्टीतील आव्हानांचा सामना करतो तो युवा असतो. युवकांनी मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. यासाठी ध्यान आणि योग करा जीवन गमावून आत्महत्या करू नका.

Tags

follow us