Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या मयूरपंख रथामधून हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati) बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघणार असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन (Punit Balan) यांनी दिली. बाप्पाची विसर्जन मिरवणूक रात्री आठ वाजता टिळक पुतळा येथून सुरु होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक लक्षवेधक असणार आहे. यावेळी आचार्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता अनंत चतुर्दशीची पूजा होणार असून यानंतर साडेआठ वाजता वरद विघ्नेश्वर वाडा येथून बाप्पाचा ‘मयुरपंखी रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होणार आहे.
दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर रात्री आठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच या मिरवणुकीसाठी आकर्षक विद्युत रोषणाईने मयूरपंख रथ सजविण्यात आला आहे आणि या रथासमोर पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा पथके असणार आहे असं देखील ते म्हणाले. याच बरोबर श्रीराम, शिवमुद्रा आणि समर्थ या ढोल ताशा पथकांबरोबरच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक होणार आणि वेळेत विसर्जन मिरवणूक संपविण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असेल असेही यावेळी ते म्हणाले.
जगभरातील गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक असते. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे करता येणार याकडे आमचा प्रयत्न आहे.
सुजय विखे वाढवणार थोरातांचं टेन्शन? विधानसभेसाठी संगमनेरमधून ठोकला दावा
सर्व गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा असा आवाहन देखील यावेळी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.