Mandar Kiwale : शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळेवर पुणे सत्र न्यायालयाच्या बाहेर जीवघेणा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जामीनवर बाहेर असणाऱ्या मंदार किवळे न्यायालयीन कामकाजासाठी 25 नोव्हेंबर रोजी पुणे सत्र न्यायालयात आला होता मात्र 1.30 च्या सुमारास दोन दुचाकींवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला मात्र टार्गेट चुकल्याने दुसऱ्या हल्लेखोरांनी कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात किवळे गंभीर झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे मंदार किवळेवर जीवघेणा हल्ला होत असताना घटनास्थळी अनेक जण उपस्थित होते मात्र एकही मदतीसाठी पुढे येत नव्हता असं असे प्रत्यक्षदर्शी ॲड. शुभांगी परुळेकर यांनी सांगितले.
मी चार क्रमांकाच्या गेटमधून बाहेर आले, तेव्हा अचानक धावपळ सुरु असल्याचे दिसले. गोळीबाराचा (Mandar Kiwale) आवाज ऐकून मी पोलीस कर्मचाऱ्यांना पाहण्यास सांगितले. त्यानंतर एक कॉन्स्टेबल गेटच्या दिशेने गेला मात्र हल्ला सुरु असताना मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. हल्लेखोरांकडे पिस्तूल आणि कोयत्यासारखी शस्त्रे होती. हल्ल्यात जखमी झालेला मंदार रक्तबंबाळ अवस्थेत रस्ता ओलांडून पदपथावर कोसळला. मी पोलिसांना बोलावण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेसाठी फोन केला मात्र संपर्क साधण्यात अडचण येत होती. मी रिक्षाचालकांनाही थांबविण्याचा प्रयत्न केला पण कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हते असं ॲड. परुळेकर (Shubhangi Parulekar) यांनी सांगितले.
भावाचा बदला घेण्यासाठी मंदार किवळेवर हल्ला, 2025 मधील शुभम चव्हाण प्रकरण काय?-
माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस…
न्यायालयासारख्या अतिसंवेदनसील परिसराच्या अवघ्या 50 मीटर अंतरावर पिस्तूल, कोयत्याने झालेल्या क्रूर हल्ल्यात माझा पक्षकार मंदार किवळे रक्ताच्या थारोक्यात पडला होता. त्याची मदत करण्यासाठी मी पोलिसांना हाका मारल्या, रिक्षाचालकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र, कोणतीही मदत न मिळाल्याने मी हतबल झाले होते. माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस… असा धीर त्याला देत होते. त्याच्या डोळ्यात जगण्याची धडपड दिसत होती असं प्रत्यक्षदर्शी वकील शुभांगी परुळेकर यांनी सांगितलं.
