Download App

मोठी बातमी : सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले अडचणीत; पीएफ घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले (Maruti Navale) यांच्यावर लाखो रुपयांचा भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉव्हिडंट फंड घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीएफ विभागाचे भविष्य निधी निरीक्षक यांच्या तक्रारीवरुन पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नवले यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात झालेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Sinhagad Institute’s founder Maruti Navale booked for financial fraud in his education institutes)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मारुती नवले यांना पुण्यातील नावाजलेले उद्योजक आणि शिक्षण संस्थाचालक म्हणून ओळखले जाते. पुण्याच्या आजूबाजूच्या भागात त्यांच्या अनेक मोठ्या शिक्षण संस्था आहेत. यापैकीच कोंढव्यात सिंहगड सिटी स्कूल नावाची संस्था आहे. या संस्थेत दीडशेपेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. गत चार वर्षांपासून प्रॉव्हिडंट फंडची रक्कम आमच्या पगारातून वजा केली जात होती, मात्र ही रक्कम आपल्या प्रॉव्हिडंट फंड खात्यात जमाच होत नसल्याचा आरोप या सर्व कर्मचाऱ्यांकडून केला जात होता.

Rain Alert : पुणे-नगरकरांनो सावधान! आजही ‘अवकाळी’ बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

या तक्रारी आणि आरोपांची दखल घेत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या पथकाने सिंहगड सिटी स्कूल शाळेला पाच जुलै 2022 रोजी भेट देत इन्स्पेक्शन केले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारशीट, बँके डिटेल्स, व्यावसायिक कर आणि बॅलेन्स शीटसह इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात पगारपत्रकानुसार 115 ते 116 कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2019 ते जून 2022 पर्यंत मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीचे 74 लाख 68 हजार 636 रुपये कपात केल्याचे आढळून आले. परंतु, यापैकी तीन लाख 75 हजार 774 रुपये एवढीच रक्कम जमा करण्यात आली होती.

बाळासाहेबांचे विचार म्हणता पण कृतीत काय आणलं? राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

उर्वरित 70 लाख 92 हजार 862 एवढी कपात केलेली रक्कम नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे उघड झाले. यानंतर या प्रकरणात त्यांच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात याबाबत अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. यात केवळ या एका संस्थेतच हा घोटाळा झाला की अन्य संस्थांमध्येही असा घोटाळा झाला आहे का? याचाही पोलीस तपास सुरु आहे.

Tags

follow us