स्मिता जाधव-पाटील पदवीधरच्या रिंगणात; भाजपकडून ‘चाणक्य’ सतेज पाटलांची कोंडी ?

Satej Patil-पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल तो निवडून आणण्यासाठी मी काम करणार आहे.

Satej Patil

Satej Patil

Pune Graduates Constituency : राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागेच्या निवडणुकीमध्ये दररोज एक-एक नवा ट्विस्ट येतोय. महायुतीत भाजपने पुणे शिक्षक व पदवीधर दोन्ही जागा आपल्याकडे खेचून आणत दोन्ही जागांवर उमेदवार दिलेत. पदवीधरच्या जागेवर भाजपने नवा डाव खेळला आहे. डॉ. स्मिता पाटील-जाधव (Dr.Smita Patil-Jadhav) यांना उमेदवारी देत मोठी राजकीय खेळी केलीय. अचानक उमेदवारी मिळालेल्या डॉ. स्मिता पाटील-जाधव कोण आहेत ? काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांची भाजपने अडचण कशी केलीय हेच पाहुया…

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांपासून मोदींपर्यंत राऊतांचा निशाणा; फडणवीसांच्या ‘राजकारणा’वरही मोठं वक्तव्य

कोण आहेत डॉ. स्मिता पाटील ?
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप नवा डाव खेळला आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाशी संबंधित डॉ. स्मिता पाटील-जाधव (Dr.Smita Jadhav) यांना उमेदवारी दिलीय. स्मिता जाधव या शिक्षण संस्थाचालक पी. डी. पाटील यांच्या कन्या आहेत. त्या उच्च शिक्षित असून, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू आहेत. तर डॉ. डी. वाय. विद्यापीठ सोसायटीच्या विश्वस्त आहेत. तर दैनिक ‘पुढारी’ वृत्तसमूहाचे चेअरमन आणि समूह संपादक योगेश जाधव यांच्या पत्नी आहेत. त्यांचे राजकारणात नातेसंबंध आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री व कोल्हापूरचे काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील हे त्यांचे सख्ये मामा आहेत.

घर फोडणे हा भाजपचा अजेंडा, राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणणार-सतेज पाटील
भाची स्मिता पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी भाजपवर आगपाखड केलीय. घर फोडणे हा भाजपचा अजेंडा असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केलाय. पण निवडणूक याचा परिणाम होणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहेत. पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल तो निवडून आणण्यासाठी मी काम करणास असे सांगत भाचीविरोधात सतेज पाटील यांनी दंड थोपाटले आहेत. तर दुसरीकडे स्मिता जाधव-पाटील यांनी आपल्याला सख्ये मामा सतेज पाटील यांचा आशीर्वाद कायम पाठीशी असेल, असे विधान केलंय. या विधानाची जोरदार राजकीय चर्चा सुरू झालीय.


महाराष्ट्राचे नवीन पप्पू दिल्लीच्या नेतृत्वाला खुश करताय; रोहित पवारांच्या आंदोलनावरून पाचपुतेंचा टोला

सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची
मागील निवडणुकीत सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. सतेज पाटील यांच्यामुळे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी बाजी मारली होती. तर पदवीधरमधून राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झाले होते. यंदा लाड हे निवडून लढवत नाहीत. त्यांचा मुलगा शरद लाड यांचे तिकीट भाजपने कापले आहे. तर सतेज पाटील यांची भाची डॉ. स्मिता पाटील-जाधव यांना उमेदवारी दिलीय. कोल्हापूरमधील अनेक नेते महायुतीमध्ये आहेत. केवळ कोल्हापूरात सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे मोठे नेते राहिलेले आहेत. तेच भाजप, राष्ट्रवादीला अनेक निवडणुकीत फाइट देत आहेत. आता सतेज पाटील यांच्या सख्या भाचीचा निवडणुकीचे तिकीट देऊन भाजपने त्यांची एकप्रकारे कोंडी केलीय हे नक्की.

Exit mobile version