सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी, स्वत: दिली खळबळजनक माहिती

मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा. गाडी चालवताना फोन बंद ठेवा. फोन स्विच ऑफ ठेवलात तर चांगलं.

News Photo   2025 11 10T191651.621

News Photo 2025 11 10T191651.621

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. (Damania) काही विश्वसनीय सूत्रांकडं ‘माझा गेम केला जाणार’ अशा गंभीर स्वरूपाचे इनपुट असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः फोन करून दमानिया यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सिक्युरिटी नाकारली आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनी स्वतः याबाबतची माहिती देत सांगितले की,“मी अमेरिकेत असताना मला एका सीनियर अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की त्यांच्या हाताला काही इनपुट मिळाले आहेत की तुमचा गेम केला जाणार आहे. काही लोकांना वाटतंय की ‘यांचा अति होतोय, यांचा गेम करायचाच’, अशा प्रकारच्या चर्चा त्यांच्या कानावर आल्या आहेत असंही त्या म्हणाल्या.

अंजली दमानिया यांच्या पतीची ‘मित्रा’ संस्थेत नियुक्ती; रोहित पवारांची टीका, दमानियांनी काय उत्तर दिलं?

मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा. गाडी चालवताना फोन बंद ठेवा. फोन स्विच ऑफ ठेवलात तर चांगलं. मला स्पष्टपणे सावध राहण्याचे निर्देश दिले गेले. तसंच, दमानिया यांनी सांगितलं की, संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळवली आहे. “या इशाऱ्याची गंभीरता लक्षात घेता त्यांनी ताबडतोब महाराष्ट्र सरकारला माहिती दिली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

अंजली दमानिया यांनी अजून एक महत्त्वाची बाब उघड केली,“सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी मिळाली त्या फोनच्या आदल्या दिवशीच मला हा इशारा मिळाला होता. या सर्व परिस्थितीतही दमानिया यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. त्या म्हणाल्या,मला सिक्युरिटी घ्यायला सांगितलं आहे. मी एकदा नाही, दोनदा लिहून दिलं आहे की मला सिक्युरिटी नको आहे. मी सिक्युरिटी घेणार नाही. मी माझं काम सुरू ठेवणार.

Exit mobile version