Download App

“पांडुरंगाच्या सेवेचं फळ मिळालं…” : अजितदादांच्या आईनं पंढरपूरमध्ये जाऊन घेतलं दर्शन

पंढरपूर : अजित पवार यांचं उपमुख्यमंत्री होणं हे पांडुरंगाच्या सेवेचं फळ मिळालं, अशी कृतज्ञता व्यक्त करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आई आशाताई पवार विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी लीन झाल्या. आज (10 जुलै) पंढरपूरमध्ये जाऊन श्री. विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आज पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते. छान वाटत आहे. अजित उपमुख्यमंत्री झाला याचा आनंद आहे. पांडुरंगाच्या सेवेचं फळ मिळालं, अशी प्रतिक्रिया दिली. (DCM Ajit Pawar’s Mother Ashatai Pawar visit Padharpur Vitthal Temple)

गेल्या आठवड्यात रविवारी अजित पवार पक्षातील 32 ते 35 आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह 9 आमदारांचा मंत्रिमंडळातही समावेश करण्यात आला. त्यानंतर अजित पवारांनी थेट पक्षावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेळावे घेतले आहेत. त्यात दोघांनी आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. चाळीसपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजितदादांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर; शरद पवार असणार प्रमुख पाहुणे

बंडानंतर काका-पुतणे पहिल्यांदाच येणार एका मंचावर :

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमाचे शरद पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे.  या सर्वांनी येण्याचं मान्य केलं असल्याची माहिती आहे.

Tags

follow us