पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण (Sunny Vinayak Nimhan) यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा रविवारी 1 मार्च रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे.
नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की “बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून तो विचारशक्ती, संयम आणि निर्णयक्षमता विकसित करणारा बौद्धिक व्यासपीठ आहे. आपल्या भागातील लहान मुलांपासून युवा खेळाडूंना स्पर्धात्मक संधी मिळावी आणि त्यांच्यातील गुणवत्ता पुढे यावी, हा ‘सुपर सनी मंथ’ मागील मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडतील, असा मला विश्वास आहे.”
स्पर्धेत एकूण 1 लाख रुपयांची पारितोषिके, करंडक देण्यात येणार आहेत. पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेखाली होत असलेली हि स्पर्धा 7,10,12,15 वर्षाखालील व खुल्या गटात पार पडणार आहे.
स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत विविध वयोगटात मिळून 170 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये 50 रेटेड खेळाडूंचा देखील समावेश आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी स्पर्धा संचालक व एमसीएचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे (9822303540) व दिक्षा गडसिंग(7837830406) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
