Someshwar Karkhana Election: सुनेत्रा पवारांच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय, बंडखोर पुरुषोत्तम जगताप पिछाडीवर

Someshwar Karkhana Election : मतमोजणीदरम्यान सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलच्या पाच उमेदवारांनी विजय मिळवल्याची माहिती समोर आली आहे.

Sunetra Pawar

Sunetra Pawar

Someshwar Karkhana Election: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या पॅनेलच्या पाच जणांनी विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युगेंद्र पवार यांच्या पॅनल व बंडखोर पुरुषोत्तम ( Purushottam Jagtap) जगताप यांच्या पॅनेल आतापर्यंत काहीच यश मिळालेले नाहीत. तर बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप हे पिछाडीवर आहेत.

राज्याचे लक्ष लागलेल्या निवडणुकीसाठी रविवारी 84 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत ‘सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने आघाडी घेतली आहे.


Retail Inflation : देशात महागाई वाढली; किरकोळ महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 5.54 %


सुनेत्रा पवारांच्या पाच उमेदवारांचा विजय

मतमोजणीदरम्यान सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलच्या पाच उमेदवारांनी विजय मिळवल्याची माहिती समोर आली आहे. प्रमोद काकडे, अभिजीत काकडे आणि राजवर्धन शिंदे यांच्यासह पॅनेलच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या निकालामुळे सुनेत्रा पवार समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


देशाच्या राजकारणात चमत्कार ! 70 टक्के मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजप कसा जिंकला ?

पुरुषोत्तम जगताप पिछाडीवर; विरोधकांना धक्का
या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने लढत अधिक रंगतदार झाली होती. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये जगताप यांच्या पॅनेलला अपेक्षित आघाडी मिळालेली नाही. सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर असल्याने जगताप गटासह युगेंद्र पवार यांच्या पॅनेलसमोरही आव्हान निर्माण झाले आहे.


निंबूत-खंडाळा गटात सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी

निंबूत-खंडाळा गटातून अभिजीत सतीश काकडे, प्रमोद भगवानराव काकडे आणि वसंतराव रामराव दगडे हे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. या उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर सुमारे साडेतीन हजार मतांची आघाडी घेतलीय. सोमेश्वर कारखान्याची निवडणूक केवळ सहकारी संस्थेच्या सत्तेपुरती मर्यादित नाही. बारामतीसह आसपासच्या तालुक्यांतील राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची आघाडी आणि पुरुषोत्तम जगताप यांची पिछाडी याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ब गटातून संग्राम सोरटे विजयी
श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलचे उमेदवार संग्राम सोरटे यांनी ब वर्ग गटातून विजय मिळविला आहे.संग्राम सोरटे यांनी ब वर्ग गटातून 93 मते मिळवत विजय नोंदवला. या गटातून विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर पॅनेलचे महेश राणे निवडणूक लढवत होते. मात्र, या लढतीत सोरटे यांनी बाजी मारली.

Exit mobile version