देशाच्या राजकारणात चमत्कार ! 70 टक्के मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजप कसा जिंकला ?
Rejinagar Bye Election : पोटनिवडणुकीत भाजपचा (bjp) उमेदवार चक्क 75 हजार मतांनी निवडून आला आहे. भारतीय राजकारणातील इतिहासातील हा मोठा चमत्कार आहे.
Rejinagar Bye Election : मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजप जिंकत नाही, असा आजपर्यंत इतिहास राहिलेला नाही. त्यामुळे काँग्रेस असो इतर प्रादेशिक पक्षाचे नेते मुस्लिम बहुल मतदारसंघ निवडतात आणि सेफपणे मोठ्या मताधिक्यांनी बाजी मारतात. आता पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उलटे फासे पडले आहेत. ज्या रेझीनगर मतदारसंघात 65 ते 70 टक्के मुस्लिम मतदार आहेत. सहा महिन्यांपूर्वी तिथे मुस्लिम उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आला होता. तेथे पोटनिवडणुकीत भाजपचा (bjp) उमेदवार चक्क 75 हजार मतांनी निवडून आला आहे. भारतीय राजकारणातील इतिहासातील हा मोठा चमत्कार आहे. ही पोटनिवडणूक का झाली ? भाजपने कशी बाजी मारली ? मुस्लिम मतदारांनी भाजपला स्वीकारले का हेच पाहुया…
पश्चिम बंगालमधील सार्वत्रिक निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा गड भाजपने उद्धवस्त करत सत्ता आणली आहे. पोटनिवडणुकीत नंदीग्राम आणि मुर्शिदाबादमधील रेझीनगरमध्ये मतदारसंघ भाजप जिंकले आहेत. त्यात रेझीनगरमध्ये काही वेगळ्या राजकीय गणिते निर्माण झाले आहेत. कारण चार महिन्यांपूर्वी येथून आम जनता उन्नयन पार्टीचे (AJUP) प्रमुख हुमायूं कबीर हे निवडून आले होते. पण दुसरा एक मतदारसंघ नाओदामधून निवडून आले होते. त्यामुळे त्यांनी रेझीनगर मतदारसंघ सोडला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी मुलगा गुलाम नबी आझाद (रॉबीन) यांना मतदानासाठी उतरविले होते. हा मतदारसंघ मुस्लिम उमेदवाराला सेफ वाटत होता. मतमोजणीनंतर सगळे गणित बदलले आहे. कारण येथून भाजपचे उमेदवार शंखराव सरकार हे तब्बल 75 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. सरकार यांना 1 लाख 29 हजार मते मिळाली आहेत. तर आझाद यांना केवळ 54 हजार मते मिळाले आहे. टीएमसी, काँग्रेस व इतर छोट्या पक्षांच्या उमेदवार रिंगणात होते. त्यांना सर्वांना मिळून 17 हजार मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ सात हजार, तर तृणमूल काँग्रेसच्या रबीउल आलम चौधरी यांना 3 हजार 800 मते मिळाली होती. हे चौधरी 2021 ला एक लाख 18 हजार मते घेऊन विजयी झाले होते. गेल्या दोन निवडणुकीत भाजपचा उमेदवाराला येथे 50 हजार मते मिळाली होती. या मतदारसंघात सुमारे 80 हिंदू मते आहेत. त्यामुळे हे मते मिळत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
SIR फॉर्म 6 वर सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण; निवडणूक आयोगाच्या दाव्यावर न्यायालयानं काय सांगितलं?
पोटनिवडणुकीत समीकरणे कसे बदलले ?
रेझीनगर मतदारसंघात 2 लाख 57 हजार मतदान आहे. त्यातील 65 ते 70 टक्के म्हणजे 1 लाख 65 हजार मुस्लिम मतदार आहेत. हिंदू मतदार 75 ते 80 हजार इतके आहेत. चार महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत या मतदारसंघातून हुमायूं कबीर हे 1 लाख 23 हजार मते घेऊन विजयी झाले होते. तर भाजपच्या उमेदवार बापन घोष यांना 64 हजार मते मिळाली होती. सुमारे हुमायूं कबीर 70 हजार मतांनी विजयी झाले होते. पंरतु पोटनिवडणुकीत चित्र उलट झाले आणि भाजपने ही जागा तब्बल 75 हजार मतांच्या फरकाने जिंकली आहे. म्हणजेच 80 हजार हिंदू मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे. तर उर्वरित 50 हजार मुस्लिम मतदारांनी एकगठ्ठा भाजपला मतदान केल्याचे दिसून येत आहे. हा चर्चेचा मुद्दा झाला आहे. मुस्लिम बहुल भागात मुस्लिम मतदार हे भाजपला मतदान देत नाहीत. तिथे एकगठ्ठा मतदान झाले आहे. हा चर्चेचा मुद्दा झालाय.
दबाव होता की जुन्या आमदारावर राग ?
येथील मुस्लिम सत्तेबरोबर गेल्याचे बोलले आहेत. तसेच नागरिकत्व, जमिनीचे कागदपत्रे, बुलडोझर कारवाई टाळण्यासाठी सत्तेचा बाजूने मतदान केल्याचे एक बाजू आहे. दुसरी बाजू आहे, मुस्लिम उमेदवाराकडून विकासकामे न होणे. रोजगार न देणे, हॉस्पिटलच्या सुविधा न भारल्यामुळे मुस्लिम मतदारांनी धार्मिक मुद्दा बाजूला ठेवत भाजपला निवडून दिल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीनंतर मतदारांवर दबाव होता. खोटे मतदान घडवून आणल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मुस्लिम बहुल सेफ राहिला का ?
मुस्लिम बहुल मतदारसंघ सेफ मानला जातो. राहुल गांधी हे वायनाडचे खासदार आहेत. या मतदारसंघ मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत. परंतु आता या निवडणुकीने मुस्लिम बहुल मतदारसंघ सेफ राहिलेला नाही हे दिसून येत आहे. त्यामुळे मुस्लिम लीडसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. त्यामुळे भविष्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमधील, महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल मतदारसंघ हे सेफ राहिलेले नाहीत. हे नक्की.