Download App

Pune Metro : कासारवाडी रेल्वे स्टेशनवर स्पार्किंग ब्लास्ट, मेट्रोची एक मार्गिका बंद

  • Written By: Last Updated:

Pune Metro Sparking Blast : रेल्वे अपघाताच्या अनेक अनेक घटना घडत असतात. आताही पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे. पुणे मेट्रोला (Pune Metro) स्पार्किंग ब्लास्ट (Sparking Blast) झाला आहे. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मेट्रो चिंचवड येथून निघाली होती. मात्र, कासारवाडी स्टेशनवर (Kasarwadi Station)या मेट्रोला स्पार्किंग ब्लास्ट (Sparking Blast झाला. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नाही किंवा जीवीतहाणी झाली नाही. मात्र, एक मार्गिका बंद करण्यात आल्याची माहिती आहे.

Pune Metro : कासारवाडी रेल्वे स्टेशनवर स्पार्किंग ब्लास्ट, मेट्रोची एक मार्गिका बंद 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोमध्ये शुक्रवारी (दि. 12 जानेवारी) सायंकाळी ईलेक्ट्रिक स्पार्किंगमुळे बिघाड झाला. त्यामुळे ही मेट्रो सध्या मार्गात थांबली असून यामुळं एक मार्गिका बंद झाली आहे. ही मेट्रो चिंचवडहून सायंकाळी ६.३७ वाजता सुटली होती. मेट्रो प्रवाशांना घेऊन कासारवाडी स्टेशनवर आली असता अचाकन ईलेक्ट्रिक स्पार्किंग झाली. ही बाब लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने मेट्रो थांबवली. आणि प्रवाशांना मेट्रोतून उतरवले. यावेळी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची पळापळ झाली होती. स्पार्किंगग्रस्त झालेल्या रेल्वेतील प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली.

मेट्रोला ईलेक्ट्रिक स्पार्किंग ब्लास्ट होताच प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. रेल्वे फलाटावर थांबताच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ केली, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरम्यान, या प्रकारची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी स्टेशनवर धाव घेतली असून सध्या रेल्वेचा बिघाड दुरूस्त करण्याचे काम सुरू असल्याचं पुणे मेट्रोच्या वरिष्ठांनी सांगितलं. मात्र, ही मेट्रोचा बिघाड कधीपर्यंत दुरूस्त होईल, याबाबत कोणहीही माहिती देण्यात आली नाही.

follow us