Dr. Pradip Kurulkar : भारताची क्षेपणास्त्र मोहीम, भारताचा आण्विक ऊर्जा कार्यक्रम, भारतीय सैन्य दलांना उपयुक्त ठरणारं वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान यांसारख्या अतिशय संवेदनशील मोहिमांचा भाग असलेले डीआरडीओचे (DRDO) संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर (Pradip kurulkar) हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात अडकले आहेत.
Panama Papers : सीरमचे संचालकांवर ईडीची कारवाई, 41.64 कोटींची मालमत्ता जप्त
पाकिस्तानकडून (Pakistan) गेल्या काही वर्षं भारतीय सैन्यदलातील अधिकारी, जवान आणि शास्त्रज्ञांसाठी पद्धतशीरपणे हनी ट्रॅपच जाळे तयार केले जात आहे. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या आवडी निवडीची माहिती काढून त्याला हेरले जात आहे. प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या अगोदर त्यांच्या वर्तवणुकीचा अभ्यास करण्यात आला होता.
एटीएस कोठडी संपल्याने आज कुरुलकरांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांनी कोणती संवेदनशील माहिती शत्रूराष्ट्राला पुरवली याचा तपास करण्यासाठी त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी एटीएसकडून करण्यात आली आहे. न्यायालयाने ती मान्य करत कुरुलकर यांच्या कोठडीमध्ये 15 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
तसेच पाकिस्तान सोबतचे युद्ध जेवढं प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढलं जात आहे, तेवढंच ते सायबर क्राईमच्या माध्यमातून देखील सोशल मीडियावरही लढलं जात आहे. भारतीय सैन्यदलातील अधिकारी, जवान आणि शास्त्रज्ञ यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून सतत हनी ट्रॅपचा उपयोग करत असलयाचे यावेळी सांगण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये लष्करातील अनेक बडे अधिकारी, जवान आणि शास्त्रज्ञ या हनी ट्रॅपची शिकार बनले आहेत. त्यामध्ये आता प्रदीप कुरुलकरांचा देखील समावेश झाला आहे. गेल्या काही वर्षातील हनी ट्रॅपच्या घटना पाहता भारतीय सैन्यदलांसमोरील आव्हान मोठं असल्याचे लक्षात येत आहे.