Panama Papers : सीरमचे संचालकांवर ईडीची कारवाई, 41.64 कोटींची मालमत्ता जप्त

Panama Papers : सीरमचे संचालकांवर ईडीची कारवाई, 41.64 कोटींची मालमत्ता जप्त

Javreh Soli Punavala : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक जवरेह सोली पुनावाला यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. यामध्ये पुनावाला यांची तब्बल 41.64 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्यांतर्गत ही कारवाई ईडीने केल्याचं सांगण्यात येत आहे. पुनावाला यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

पुनावाला यांच्या मालकीच्या सीजे हाऊस, वरळी, मुंबई येथे असलेल्या मालमत्तांवर ही धाड टाकण्यात आली आहे. जवरेह सोली पुनावाला यांचं नाव पनामा पेपर्समध्येही आलं होतं. दरम्यान सोमवारी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात आली त्यातून मिळालेल्या माहितीनुसार पुनावाला यांची तब्बल 41.64 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

गौतमी पाटीलच्या अदाकारीने प्रेक्षक घायाळ; थेट छप्परच कोसळले

त्यांच्या कुटुंबीयांची सध्या FEMA च्या अंतर्गत लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची जप्ती ही या कायद्याच्या कलमांतर्गत करण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube