उद्योजकता म्हणजे नव कल्पना, नेतृत्व गुण, समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्याची एक चळवळ-अंकुश झनवर

Pimpri Chinchwad Education Trust-एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज कन्वर्सेशन विथ यंग आंत्रप्रेन्यूअर्स" चे आयोजन करण्यात आले होते.

Pimpri Education Trust

Pimpri Education Trust

पुणे: उद्योजकता म्हणजे नव कल्पना, नेतृत्व गुण, जोखीम स्विकारण्याची तयारी आणि समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्याची वृत्ती विकसित करणारी एक चळवळ आहे, असे गणित अंक प्रा. ली. कंपनीचे संस्थापक अंकुश झनवर यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर), रावेत येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन, अँड इंटरप्राईज (सीआयआयइ) यांच्या सहकार्याने “एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज कन्वर्सेशन विथ यंग आंत्रप्रेन्यूअर्स” चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नेक्सवीटेक इंडिया प्रा.ली.चे संचालक सुजीत लोमटे, पीसीसीओइआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, उपसंचालक डॉ राहुल मापारी व अधिष्ठाता डॉ. अर्चना चौगुले, अधिष्ठाता आर अँड डी प्रमुख डॉ. सुदर्शन एस. बोबडे, आर अँड डीसह अधिष्ठाता डॉ. राहुल बावणे, डॉ. किशोर भंगाळे, विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधन समन्वयक आदी उपस्थित होते. एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीजमध्ये एकूण 115 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, स्टार्टअप संस्कृती व उद्योजकता वृत्ती विकसित करणे, तरुण उद्योजकांना थेट महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये आणून त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा या मालिकेचा उद्देश होता असे अधिष्ठाता आर अँड डी प्रमुख डॉ. सुदर्शन एस. बोबडे यांनी सांगितले. संचालक नेक्सवीटेक इंडिया प्रा. ली. चे सुजीत लोमटे यांनी स्टार्टअप उभारणीतील संधी, अडचणी, निधी उपलब्धता, नवकल्पनांचे व्यावसायिकरण आणि बाजारपेठेतील स्पर्धा याबाबत मार्गदर्शन केले.

स्वागत डॉ. सुदर्शन बोबडे, सूत्रसंचालन विद्यार्थी भाग्येश मखमाले आणि आभार डॉ. किशोर भंगाळे यांनी मानले.पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओइआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली “एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज” पार पडली.

Exit mobile version