Download App

ST Bus Accident : तीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसने दोन कारसह पाच दुचाकी उडवल्या; पुण्यातील घटना

  • Written By: Last Updated:

ST Bus Accident : पुण्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात (ST Bus Accident) झाला आहे. या बसने दोन कारसह पाच दुचाकींना या अपघातामध्ये अक्षरशः उडवले आहे. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. तर सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी या एसटी बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

नेमका कसा झाला अपघात?

एसटी महामंडळाची एक बस सांगोल्याहून पुण्यातील स्वारगेट बसस्थानकाकडे येत होती. यावेळी पुण्यातील फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक येथे आली असता या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे बसने समेर असलेल्या दोन कार आणि पाच दुचाकींना धडक दिली. यामध्ये कारमधील आठ वर्षीय मुलाला गंभीर दुखापत झाली आहे.

Eknath Khadse : ‘मराठा समाजाला दिलेला शब्द पाळा’; खडसेंनी फडणवीसांना घेरलं

तसेच इतर वाहनांतील सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी या घटनास्थळी धाव घेतली. तसेच या एसटी बसच्या या चालकाला ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर चंद्रशेखर स्वामी अस या बस चालकाचं नाव आहे. तो सांगोल्यातीलच राहिवाशी आहे.

HBD Kartik Aaryan: केक कापण्यापूर्वी कार्तिक आर्यनने ‘ही’ खास इच्छा केली व्यक्त, म्हणाले…

दरम्यान या बसचा अपघात झाला त्यावेळी बसमध्ये तब्बल 30 प्रवासी होते. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. सध्या पुण्यातील हडपसर मार्गावर वर्दळ आणि वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघातांचं प्रमाण वाढलं आहे.

जांभुळवाडी दरी पुलावर मोठा अपघात…

पुणे-बंगळुर मार्गावर कात्रज येथील नव्या बोगद्याच्या आधी जांभूळवाडी येथे दरी पूल आहे. या ठिकाणी तीव्र वळण आहे. याच दरी पुलावर शनिवारी 11 नोव्हेंबरला पहाटे ३ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने 4 ते 5 वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की चारही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कंटेनर भररस्त्यात उलटला. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले.

Tags

follow us