Sudhir Mungantiwar : हेमंत रासने सत्तेसाठी नाही तर ‘सत्या’साठी लढणार!

पुणे : कसबा पेठ मतदार (Kasba Peth Bypoll) संघात आमच्या विरोधातील उमेदवार हा सतत पक्ष बदलणारा आहे. त्यांची लढाई ही केवळ खुर्चीसाठी, सत्तेसाठी आजपर्यंत राहिली आहे. तर आमचे भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) हे कायम मतदार संघाच्या, राष्ट्राच्या कल्यानाच्या भावनेतून काम करत आहेत. त्यामुळे हेमंत रासने हे सत्तेसाठी नाही तर ‘सत्या’साठी ही निवडणूक […]

Sudhir Mungantiwar Hemant Rasne Ravindra Dhangekar

Sudhir Mungantiwar Hemant Rasne Ravindra Dhangekar

पुणे : कसबा पेठ मतदार (Kasba Peth Bypoll) संघात आमच्या विरोधातील उमेदवार हा सतत पक्ष बदलणारा आहे. त्यांची लढाई ही केवळ खुर्चीसाठी, सत्तेसाठी आजपर्यंत राहिली आहे. तर आमचे भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) हे कायम मतदार संघाच्या, राष्ट्राच्या कल्यानाच्या भावनेतून काम करत आहेत. त्यामुळे हेमंत रासने हे सत्तेसाठी नाही तर ‘सत्या’साठी ही निवडणूक लढवत आहेत, अशी भावना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली.

कसबा पेठ मतदार संघ पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश बिडकर यावेळी उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जनाजनाचा मनामनापर्यंत हा विकासाचा… राष्ट्र कल्याणाचा, कसबा मतदार संघाच्या उन्नतीचा, विकासासाठी राष्ट्रवादाची विचार, मशाल हाती घेत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे निवडणुकीत उतरले आहेत. सन १९७८ पासून (सन १९८५ चा अपवाद वगळता) आजपर्यंत या कसबा मतदार संघाने कायम भारतीय जनता पार्टीला पहिल्या क्रमांकाची पसंती दिली आहे. त्यामुळे आमचाच विजय होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

Exit mobile version